Friday, February 11, 2022

शिवाजी महाराज भाषण

शिवाजी महाराज भाषण सर्व प्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार,सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो. आज मी येथे अशा एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. "सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला" 19 फेब्रुवारी सोळाशे 30 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते.शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू.त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती. शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले.आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणीले. शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. "राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबासमान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवबा झाला" जय भवानी जय शिवाजी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय.

Shivaji Maharaj speech

Shivaji Maharaj speech First of all, greetings to my most holy motherland, honorable platform, dignitaries on the platform, venerable gurus and all Shiva devotees present. Today I am going to talk about a great person of whom not only you but the whole country is proud of the world. That is Chhatrapati Shivaji Maharaj. "सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला" On 19 th February, 1630, the golden day and on such a Tuesday, a lion was born in the womb of Jijau Mata at Shivneri fort in Pune district of Maharashtra. And that lion is the rich Shrimanyogi, the king of public welfare, the ruler knows King Shivchhatrapati Shivaji Raje Bhosle. Shivaji Maharaj was born on Shivneri fort, hence his name Shivaji. His father's name was Shahaji Raje Bhosale and his mother's name was Jijabai. Shivrai was very intelligent and sharp from his childhood. Shivaji Maharaj took oath to establish Swarajya at the age of fifteen. Creating Swarajya was not an easy task. At that time slavery was everywhere and there was a formidable enemy in front of it. In it, many brave heroes like Bajiprabhu Deshpande, Tanaji Malusare, Murarbaji Deshpande, Netaji Palkar Kondaji Farjad had supported their Shivarayas. With his shrewd and shrewd intellect and with the help of Mavals, Shivaraya defeated the formidable enemy in front of him, namely Afzal Khan, Aurangzeb, Shahistekhan and defeated them. Destroying thousands of years of slavery, he established a complete self-government and brought to light the ryots who had been in darkness for so many days. Shivrai was an environmentalist. He used to help farmers in times of drought. He forgave them all and looked after the interests of the farmers. There was no discrimination in the Swarajya. Women were respected and honored. Farmers were respected. Saints were respected. And every Marathi man was proud that Shiva Chhatrapati was our king. "राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबासमान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवबा झाला" जय भवानी जय शिवाजी By saying this, I will end my two words. Thank you Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay. जय शिवाजी जय भवानी.

शिवाजी महाराज भाषण ७

शिवाजी महाराज भाषण ७ सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आज मी तुमच्यासमोर महान युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगावर प्रकाश टाकणार आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती म्हणूनच शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यावा असे त्यांचे जिजामाता मासाहेब व सगळे सहकारी सुचवत होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यास इतर राजे व सुलतान यांच्याकडूनही राजा म्हणून मान्यता मिळेल असे सगळ्यांचे म्हणणे होते. सर्वांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी ही मान्यता दिली. रायगडाला राजधानीचे ठिकाण करण्याचे निश्चित झाले सोन्याचे रत्नजडित सिंहासन बनवले महाराज सिंहासनावर बसले की त्यांच्यावर धरण्यात येणारे रत्न मालिकांच्या व मोत्यांचे पांढरेशुभ्र छत्र तयार करण्यात आले. सात नद्यांचे पाणी आणून पवित्र जलाने भरलेले सुवर्णकुंभ तयार केले. काशीहून गागाभट्ट यांना सन्मानपूर्वक आणले. स्वराज्यातली प्रजा आनंदाने या सोहळ्यात सामील झाली राज्याभिषेकाचा दिवस उगवला. गडावर उभारलेल्या मंडपात सोन्याच्या चौरंगावर शिवप्रभू सोयराबाई व संभाजीराजे येऊन बसले राज्याभिषेकाचे मुख्य मंत्रोच्चार गागाभट्ट यांनी केले. गागाभट्टाने च्या हस्ते त्यांना राजवस्त्रे देण्यात आली. मासाहेबांना नमस्कार करून महाराज सिंहासनावर बसले त्यांच्या शेजारीच राणी व युवराज बसले. गागाभट्टांनी गजर केला..... क्षत्रिय कुलवंत, सिंहासनाधीश्वर, श्री शिवछत्रपती महाराजांचा... विजय असो !! हा गजर होताच गागाभट्टांनी व सर्वांनी फुलांचा वर्षाव केला त्याच वेळी रायगडाच्या बुरुजावरून तोफा डागल्या. शिवराय छत्रपती झाले. या अविस्मरणीय दिवसाची तारीख होती 6 जून 1674 शिवराय छत्रपती झाले आणि अवघे स्वराज्य आनंदून गेले. अशावेळी म्हणावेसे वाटते... शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी ॥ जय भवानी, जय शिवाजी ॥

शिवाजी महाराज भाषण ६

शिवाजी महाराज भाषण ६ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, प्रथम छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा ! छत्रपती शिवरायांचा जन्म पुणे जिल्हयातील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजामातेच्या पोटी झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी हे ठेवण्यात आले. बालपणी शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना नेहमी वाटत असे. वयाच्या सातव्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. अनेक विद्या त्यांनी पारंगत केल्या. १६४५ मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. आणि स्वराज्याची घोडदौड सुरु झाली. अनेक किल्ले एकामागून एक जिंकून शिवरायांनी स्वराज्य उभे केले. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळावे, स्वराज्य भक्कम व्हावे म्हणून १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. १६३०-१६८० या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत महान कामागरी बजाबून, अखेर ३० एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. रयतेला पोरके करून, रयतेचा जाणता राजा देवाघरी गेला. त्रिवार मुजरा माझा छत्रपती शिवाजी राजांना !! जय भवानी, जय शिवाजी !!

शिवाजी महाराज भाषण ५

शिवाजी महाराज भाषण ५ छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजी भोसले होते. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. त्यांचे बालपण पुण्यातील लाल महालात गेले. राम, कृष्ण, भीम, अर्जुन अशा वीरांच्या गोष्टी ऐकत जिजामातांच्या सहवासात शिवरायांचे बालपण आकार घेत गेले. १६४५ साली शिवरायांनी मावळ्यांना सोबत घेऊन, रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून त्यांनी • स्वराज्याचे तोरण बांधले. कर्तबगार आणि ध्येय्यनिष्ठ शूरवीरांच्या सोबतीने अनेक शत्रूंचा सामना करत, स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. १६७४ मध्ये शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. तीस-पस्तीस वर्षाच्या अवांत परिश्रमानंतर अखेर 13 एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. रयतेचे जाणते राजे सर्वांना सोडून गेले. जया भवानी, जय शिवाजी !!

शिवाजी महाराज भाषण ४

शिवाजी महाराज भाषण ४ नमस्कार, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ! सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या पवित्र भूमीला एक कर्तृत्ववानू आणि वीरपुत्र मिळाला. ज्याने स्वतःच्या पराक्रमाने शौर्यान, धाडसाने नव्हत्याच होत आणि होत्याच नव्हत केलं आणि या महाराष्ट्राच्या भुमीवर भगवा झेंडा रोवला. अनेक स्वकीय आणि परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थयाथया नाचत होत्या, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेक बायांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला नव्हता. मुघलांच्या कैदेत लाखो मराठ्यांचे सैन्य अन्याय सहन करत खितपत पडलेलं होतं. हाडाची काड आणि रक्ताच पाणी करून ही माणसं जगत होती. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला हवा होता एक झुंजार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली अन् सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवारी श्री शिवछत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि स्वराज्याची घौडदौड चालू झाली.पण आज साडेतीनशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या या भूमीला छत्रपती शिवरायांची गरज भासते ही खूप मोठी शोकांतिका आहे. नराधमांना अद्दल घडवण्यासाठी तलवारीला धार पाहिजे, आणि पुन्हा या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे। शिवबांनी त्या काळात रयतेचे स्वराज्य निर्माण केले. मावळ्यांच्या साथीने अनेक किल्ले सर केले. शेतकयांना, गोरगरिबांना योग्य न्याय मिळवून दिला स्वकीय आणि परकीय शत्रूना तोंड देत विजय मिळवत गेले. जाणता राजा,रयतेचा वाली, लोककल्याणकारी राजा, प्रशासक, कुशल संघटक, युगपुरुष अशी कित्येक विशेषणे शिवरायांना साजेशी ठरतात. छत्रपती शिवराय म्हणनेच राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होय. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान | जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान ||अशा या झंझावाती वादळाला, माझ्या जाणता राजाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा !! जय भवानी, जय शिवराय ||

शिवाजी महाराज भाषण ३

शिवाजी महाराज भाषण ३ सन्माननीय व्यासपीठ,आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आज मी तुमच्यासमोर एक महान युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणार आहे. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला । मावळ्यांच्या झळकल्या लख्ख तलवारी, मुघल भीतीने पळतील माघारी ॥ मनात तर सतत एकच विचार येतो, शिवबा तुम्ही अजून १० वर्षे जगला असता तर नक्कीच मुघलांनी सुध्दा भगवाच फडकवला असता.... जगणारे ते मावळे होते,जगवणारा तो महाराष्ट्र होता। पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, रयतेची मायेनी काळजी घेणारा, तो माझा शिवबा होता!! शिवराय जिजाऊंच्या सानिध्यात शूरवीटांच्या गोष्टी ऐकत तुम्ही मोठे झालात. मावळ्यांच्या साथीने पराक्रम गाजवतअनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात साकारले. गनिमी काव्याचा अवलंब करत शिवबा तुम्ही अनेक मोहिम फत्ते केल्या. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, येसाजी नेताजी पालकर, जिवा महाला कंक, यांसारख्या अनेक वीरांनी हिंदी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही. शिवबा तुम्ही परस्त्रियांनाही माता, बहिणीसमान वागणूक दिली. जात, पात, धर्म असा कुठलाही भेदभाव केला नाही. काही लोक चारित्र्यवान असतात, पण ते पराक्रमी असतीलच असे नाही. काही लोक पराक्रमी असतात, पण ते चारित्र्यवान असतीलच असे नाही. पण जो माणूस चारित्र्यवान आहे आणि पराकोटीचा पराक्रमी असा महापुरुष महाराजांशिवाय दुसरा शिवाजी कोणी असूच शकत नाही. रयतेसाठी तो जन्मभर झिजला, तयांच्या गडकोटी वसला । रक्षणार्थ मानवतेच्या या झऱ्यापुढे काळही थिजला, असा शूर शिवबा माझा रायगडी निजला ॥ १६३०-१६८० पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत असीम कामगिरी बजावत अखेर ३ एप्रिल १६८० रोजी शिवराय गेला. आदर्श पुत्र, कुशल संघटक, कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी, जाणता राजा, लोककल्याणकारी प्रशासक आणि एका नव्या युगाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. यावरून पुन्हा म्हणावेसे वाटते..... या तुमच्या रूपाने रयतेचा वाली सावध नेता, दुर्जनांचा निर्माता..... असे शिवबा... शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ॥ जय भवानी, जय शिवाजी ॥

शिवाजी महाराज जयंती भाषण २

शिवाजी महाराज जयंती भाषण २ अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती। राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती ॥ 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उजाडला. आणि अशा या मंगलक्षणी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला आणि हेच आपले शिवाजी राजे. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवीत होत्या. अशा परिस्थितीत बलाढ्य सत्तांशी शूर मावळ्यांच्या साथीने झुंज देत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. शिवराय हे जिजामाता आणि शहाजीराजे यांचे पुत्र. शिवरायांना शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही. मात्र वीर जिजामातेने संस्कारांचे बाळकडू देऊन, राम, कृष्ण, भीम, अर्जुन अशा वीरांच्या गोष्टी सांगून छत्रपतींच्या मनाला, व्यक्तीमत्त्वाला आकार दिला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. घोडेस्वारी, दांडपटटा चालवणे, तलवारबाजी अशा अनेक विदया त्यांनी पारंगत केल्या. गनिमी काव्याने लढा देत पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले. स्वराज्याचा विस्तार केला. पन्हाळगडाला वेढा, शायिस्ताखानाची फजिती, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, बादशहाच्या हातावर तुटी दिल्या, आग्र्याहून सुटका अशा अनेक घटनांमधून त्यांचे असीम शौर्य, प्रसंगावधान, चातुर्य या गुणांचे दर्शन होते. शिवरायांच्या या इतर प्रवासात त्यांना जिवा महाला, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे अनेक शुरवीर मावळ्यांची अनमोल साथ मिळाली. शिवरायांनी नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या न्यायाने ते वागले आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले.शेवटी एकच म्हणावेसे वाटते.... किती आले, किती गेले .....केले मुघलांना हद्दपार । राजे बहु धरतीवरती ना कुणा शिवबांची सर ॥

शिवाजी महाराज जयंती भाषण १

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ! न काळवेळ तयांना लागे शत्रु धारातीर्थी पाडाया। स्मरता शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया ॥ मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता हुकूमत गाजवीत होत्या. अशा कठीण परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 उजाडला. रोजी सोन्याचा दिवस एक तारा शिवनेरीवर चमकला, जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला, मानाचा मुजरा करते छत्रपतींना, ज्यांनी स्वराज्य रूपी भगवा झेंडा रोवला. शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. शिवरायांना शहाजी राजांचा फारसा सहवास मिळाला नाही. जिजाऊंच्या सावलीत आणि संस्कारात बाळकडू घेत शिवरायांचे बालपण आकार घेत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला त्यांनी अनेक विदया पारंगत केल्या. इ. स. 1640 मध्ये त्यांचा विवाह सईबाई यांच्या बरोबर थाटामाटात झाला व 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची घोडदौड सुरु झाली. त्याकाळी "ज्याचे किल्ले, त्याचे राज्य " हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, जावळी असे किल्ले एक एक करत ताब्यात घेतले.एकामागून अफजलखान, सिद्दी जोहर, दिलेरखान,शायिस्तेखान, उदयभान अशा शत्रूशी लढताना शिवरायांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने लढा दिला आणि शत्रूवर विजय मिळवला. या सर्वांच्या प्रयत्नातूच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात साकारले. म्हणून म्हणावेसे वाटते... अशी करारी नजर सदा गनिमा भेदूनी पाही आरपार । शिवरायांमुळेच जाहले स्वप्न स्वराज्याचे साकार ॥ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय ! जय भवानी, जय शिवाजी