Friday, February 11, 2022

शिवाजी महाराज भाषण ४

शिवाजी महाराज भाषण ४ नमस्कार, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ! सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या पवित्र भूमीला एक कर्तृत्ववानू आणि वीरपुत्र मिळाला. ज्याने स्वतःच्या पराक्रमाने शौर्यान, धाडसाने नव्हत्याच होत आणि होत्याच नव्हत केलं आणि या महाराष्ट्राच्या भुमीवर भगवा झेंडा रोवला. अनेक स्वकीय आणि परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थयाथया नाचत होत्या, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेक बायांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला नव्हता. मुघलांच्या कैदेत लाखो मराठ्यांचे सैन्य अन्याय सहन करत खितपत पडलेलं होतं. हाडाची काड आणि रक्ताच पाणी करून ही माणसं जगत होती. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला हवा होता एक झुंजार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली अन् सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवारी श्री शिवछत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि स्वराज्याची घौडदौड चालू झाली.पण आज साडेतीनशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या या भूमीला छत्रपती शिवरायांची गरज भासते ही खूप मोठी शोकांतिका आहे. नराधमांना अद्दल घडवण्यासाठी तलवारीला धार पाहिजे, आणि पुन्हा या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे। शिवबांनी त्या काळात रयतेचे स्वराज्य निर्माण केले. मावळ्यांच्या साथीने अनेक किल्ले सर केले. शेतकयांना, गोरगरिबांना योग्य न्याय मिळवून दिला स्वकीय आणि परकीय शत्रूना तोंड देत विजय मिळवत गेले. जाणता राजा,रयतेचा वाली, लोककल्याणकारी राजा, प्रशासक, कुशल संघटक, युगपुरुष अशी कित्येक विशेषणे शिवरायांना साजेशी ठरतात. छत्रपती शिवराय म्हणनेच राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होय. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान | जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान ||अशा या झंझावाती वादळाला, माझ्या जाणता राजाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा !! जय भवानी, जय शिवराय ||

No comments:

Post a Comment