शाळेविषयी -जि.पं.शाळा.फांगदर

माझी शाळा सुंदर शाळा
शाळेचे नाव –जिल्हा परिषद शाळा फांगदर केंद्र खामखेडा ता देवळा जिल्हा –नाशिक
शाळेबद्दल थोडक्यात – फांगदर ह्या आदिवाशी वस्ती गावापासून पाच किमी अंतरावर आहे.ह्या वस्तीवरील विध्यार्थी गावातील शाळा जास्त अंतरावर असल्यामुळे शाळेत जात नव्हती.संपूर्ण आदिवासींची वस्ती असलेल्या ह्या वस्तीवर धरूया शिक्षणाची कास करूया वस्तीचा विकास ह्या उदात्त हेतूने सन २००१ मध्ये वस्तीशाळेच्या रूपाने मुहर्तमेढ रोवली गेली.आज पंधरा वर्षात हि शाळा तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जातेय.
शाळेची स्थापना -२ जुलै २००१
शाळेचे ब्रिदवाक्य-धरूया शिक्षणाची कास करूया वस्तीचा विकास.
शाळेचे माजी विध्यार्थी-व्यावसायिक,उत्तम शेतकरी,काही शिक्षण
शाळेत राबविले जाणारे उपक्रम –१) खडकाळ डोंगराच्या माळरानावर आमच्या फांगदर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही सुंदर परसबाग फुलविली.या बागेत दीडशे झाडांबरोबर शाळेकडून परसबागेत भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे.बागेतील ताज्या भाज्यांचा शालेय पोषण आहारासाठी वापर केला जात असल्याने मुलांना दररोज सकस आहार मिळत असतो. 
२) शाळेतील विध्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून आम्ही विविध उपक्रम शाळा स्तरावर राबवत आहोत.ठेकडी,नदी,घाट,लघु उद्योग ,बायोगॅस प्रकल्प,आदर्श आधुनिक शेती,प्राथमिक आरोग्य केंद्र ,पोस्ट ऑफिस,बँक,वीटभट्टी आदि क्षेत्र भेटींचे तशेच शैक्षणिक सहल ह्या सह शालेय उपक्रमांचे वर्षभर शाळा स्तरावर आयोजन केल.
३) शाळेच्या विकासात गावाची भूमिका महत्वपूर्ण असायला हवी. शाळेला गावाचा आधार असायला हवा.म्हणून लोकसहभागासाठी पालकांपर्यंत पोहचलो.यथाशक्ती मदतीचे आव्हाहन केले.आणि वीस बेंचेस मिळवल्या .
द्विशिक्षकी शाळा असल्याने ह्या बेंचेस पुरेश्या ठरल्या त्यानंतर जिल्हा परिषद शेष निधीतून पुन्हा पंधरा बेंचेस प्राप्त झाल्याने आमच्या केंद्रातील सर्व वर्गाच्या मुलांना बसण्यासाठी बेंचेस असणारी आमची शाळा पहिलीच ठरली.
४) शैक्षणिक वर्षभरात आम्ही विध्यार्थ्याना परिसरातील मोठे उद्योग साखर कारखाना,वीटभट्टी,घाट,सिमेंट प्लग बंधारा,तीर्थक्षेत्र,आठवडे बाजार,बँक,पोस्ट,प्राथमिक आरोग्य केंद्र,माध्यमिक विद्यालय,पोल्ट्रीउद्योग,सिंचनाच्या आधुनिक पद्धती –तुषारसिंचन,ठिबक सिंचन ,कातारी,सुतारकाम,गवंडी,लोहारकाम,हातमाग,रंगारी आदि कारागीरांच्या भेटी ह्या उपक्रमा दरम्यान घेतल्या.ह्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची चौकस बुद्धी जागृत झाली.व शाळेविषयी गोडी निर्माण झाली.
५) निसर्ग सौंदर्याचे  माहेर असलेल्या पुनद प्रकल्प च्या विश्राम गृहावर  दुपारचे स्नेहभोजन एकत्रित घेत मस्त जेवण केले ह्यानंतर सहयाद्रिच्या पर्वताच्या डोंगररांगांच्या  द-याखो-यांतून हिंडताना त्याचे रौद्र, रांगडे रूप पाहात पाहातच आम्ही ह्या भागातील शेती व शेतकऱ्यांचे जिवनमान ,पिके उत्त्पन्न यासह इतर  इतिहास समजून घेतला.
ह्या भागातील अनेक छोटी छोटी  स्थळविशेष समजून घेतलेली सारी मुलं हरखून गेली.
-
ह्या भागातील हिरव्यागार डोंगररागांचे  दुरुन दर्शन घेतले. पुनद नदीचा प्रवास क्षेत्र व त्यावरील छोटी  मोठी धरणे सुळे डावा कालव्याचे  उगमस्थान पाहिली. धरणांचा तालुका असा लौकिक असलेल्या कळवण  तालुक्यातली  प्रवासाच्या वाटेवरील लहान लहान धरणं पाहिली. घाट, पर्वतमाथे न्याहाळले. विराट डोंगररांगांचा  थाट डोळे भरून पाहिला.
                    
आमच्या शाळेची कळवण तालुका  दर्शन सहल अत्यंत कमी खर्चात (म्हणजे एका मुलाला अवघ्या ५० रूपये खर्चात!) आणि जास्तीत जास्त उत्साहात आनंदात झाली जेष्ठ शिक्षक मुख्याध्यापक आनंदा पवार  यांच्या मुळे  हे शक्य झाले माझी ह्या भागात सहल न्यावी म्हणून आग्रह होता माझी मागणी ग्राह्य धरत पूर्तता केल्याबद्दल जेष्टांचे मनपूर्वक  धन्यवाद खरा आनंद हा कि विध्यार्थ्यांना निसर्गाचा मनमुराद अनुभव घ्यायला मिळाला हि एकदिवसीय सहल विध्यार्थ्यांच्या मनावर दोन ते तिन महिने अक्षरशा गारुड करत होती शिवाय मुलांना  यात इतिहास-भूगोल असे शिकायला मिळाले. त्यामुळे हि सहल विध्यार्थ्यांसह माझ्या हि स्मृती पटलावरून कधीही विस्मृतीस जाणार नाही असाच अनुभव देणारी ठरली
सेमी इंग्रजी पर्याय-सन २०१४ वर्ष्या पासुन पहिली पासुन सेमी सुरु पहिलीचे विध्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या चारशे शब्धांचा शब्द साठा तयार सुरवातीपासून इंग्रजी विषयावर अधिक भर.
शाळेची प्रवेश प्रक्रिया-शासकीय नियमानुसार सत्र सुरु होण्यापूर्वी प्रवेशाची सुरुवात.
शाळेचा दूरध्वनी ,मेल –मोबा -९४२३९३२६९८ zpschoolphangdar@gmail.com ,khandumore34@gmail.com.
सर्वसाधारण शाळेची वार्षिक फी-निशुल्क सर्वांसाठी फ्री
खेळाचे मैदान –शालेय परिसरात व खेळासाठी स्वतंत्र असे वेगवेगळे आहे.
शाळेची यशोगाथा-१)केंद्रातील तशेच तालुक्यातील उपक्रमशील शाळा.
२) स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून तालुक्यातील लौकिक प्राप्त शाळा.
३) सन २००९मध्ये शाळेचा विध्यार्थी प्रणव भाऊसाहेब शेवाळे विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उतीर्ण.
४)सन २०१४-१५ ह्या शैक्षणिक वर्ष्यात शाळेला गुणवत्ता विकासात तालुक्यातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान.
५)सन २०१३-१४ मध्ये पंचायत समिती देवळा गटविकास अधिकार्यांनी एक दिवस शाळेसाठी उपक्रमाकरिता शाळेला घेतले दत्तक महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी संपूर्ण दिवस भर शाळेत थांबत विध्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापन.
६) शिक्षण मोह्त्सव कार्यक्रमात तालुकास्तरावर शाळेच्या शिक्षकांसह विध्यार्थ्यांचा  सहभाग ,विज्ञान प्रदर्शांत गेल्या पंधरा वर्ष्यापासून सहभाग.
७)लोकसहभागातून इम्पलीफायर,संगीत साहित्य एलसीडी प्रोजेक्टर,क्रीडा साहित्य घंटा,विध्यार्थ्यांना गणवेश व बुटांचे वाटप,लोक सहभागातून वीस बेंचेस शाळेला उपलब्ध.शैक्षणिक साहित्य ,लेखन साहित्य.
८)शासकीय योजनांचा सर्व विध्यार्थ्यांना लाभ ,वैयाक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थी विध्यार्थ्यांना पुरेपूर फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
९)इयत्ता पहिली पासुन विध्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे आनंदायी अध्ययन व अध्यापन इंग्रजी विषयाच्या सर्व ऱ्हाईम्स,मॉरल स्टोरीजची संगणकावर दर दिवशी प्रक्षेपण.
१०)वार्षिक स्नेह संमेलनात शाळेतील प्रत्येक विध्यार्थ्याचा कृतियुक्त सहभाग व सर्वाना सहभागाची संधी.
११)जिल्ह्यातील नामांकित कवींची शालेय स्तरावर ओळक कवींची व कवितांची हा तालुक्यातील नाविन्य पूर्ण उपक्रम.                                       
 श्री खंडू नानाजी मोरे,प्राथमिक शिक्षक 
                                                                       जिल्हा परिषद शाळा फांगदर 
                                                                            ता देवळा जिल्हा नाशिक 
                                                                                            ७५८८०१५०७०

2 comments: