Friday, February 11, 2022

शिवाजी महाराज भाषण ७

शिवाजी महाराज भाषण ७ सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आज मी तुमच्यासमोर महान युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगावर प्रकाश टाकणार आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती म्हणूनच शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यावा असे त्यांचे जिजामाता मासाहेब व सगळे सहकारी सुचवत होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यास इतर राजे व सुलतान यांच्याकडूनही राजा म्हणून मान्यता मिळेल असे सगळ्यांचे म्हणणे होते. सर्वांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी ही मान्यता दिली. रायगडाला राजधानीचे ठिकाण करण्याचे निश्चित झाले सोन्याचे रत्नजडित सिंहासन बनवले महाराज सिंहासनावर बसले की त्यांच्यावर धरण्यात येणारे रत्न मालिकांच्या व मोत्यांचे पांढरेशुभ्र छत्र तयार करण्यात आले. सात नद्यांचे पाणी आणून पवित्र जलाने भरलेले सुवर्णकुंभ तयार केले. काशीहून गागाभट्ट यांना सन्मानपूर्वक आणले. स्वराज्यातली प्रजा आनंदाने या सोहळ्यात सामील झाली राज्याभिषेकाचा दिवस उगवला. गडावर उभारलेल्या मंडपात सोन्याच्या चौरंगावर शिवप्रभू सोयराबाई व संभाजीराजे येऊन बसले राज्याभिषेकाचे मुख्य मंत्रोच्चार गागाभट्ट यांनी केले. गागाभट्टाने च्या हस्ते त्यांना राजवस्त्रे देण्यात आली. मासाहेबांना नमस्कार करून महाराज सिंहासनावर बसले त्यांच्या शेजारीच राणी व युवराज बसले. गागाभट्टांनी गजर केला..... क्षत्रिय कुलवंत, सिंहासनाधीश्वर, श्री शिवछत्रपती महाराजांचा... विजय असो !! हा गजर होताच गागाभट्टांनी व सर्वांनी फुलांचा वर्षाव केला त्याच वेळी रायगडाच्या बुरुजावरून तोफा डागल्या. शिवराय छत्रपती झाले. या अविस्मरणीय दिवसाची तारीख होती 6 जून 1674 शिवराय छत्रपती झाले आणि अवघे स्वराज्य आनंदून गेले. अशावेळी म्हणावेसे वाटते... शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी ॥ जय भवानी, जय शिवाजी ॥

No comments:

Post a Comment