Friday, February 11, 2022
शिवाजी महाराज भाषण ६
शिवाजी महाराज भाषण ६
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, प्रथम छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा !
छत्रपती शिवरायांचा जन्म पुणे जिल्हयातील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजामातेच्या पोटी झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी हे ठेवण्यात आले.
बालपणी शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना नेहमी वाटत असे. वयाच्या सातव्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. अनेक विद्या त्यांनी पारंगत केल्या. १६४५ मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. आणि स्वराज्याची घोडदौड सुरु झाली.
अनेक किल्ले एकामागून एक जिंकून शिवरायांनी स्वराज्य उभे केले. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळावे, स्वराज्य भक्कम व्हावे म्हणून १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
१६३०-१६८० या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत महान कामागरी बजाबून, अखेर ३० एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. रयतेला पोरके करून, रयतेचा जाणता राजा देवाघरी गेला. त्रिवार मुजरा माझा छत्रपती शिवाजी राजांना !!
जय भवानी, जय शिवाजी !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment