मुलांकरीता
लेखन साहित्यासाठी आवाहन.....एक हात मदतीचा.....!!!
शिक्षण ही मूलभूत गरज असून
शिक्षणासाठी शासन सर्वतोपरी मदतही करत आहे परंतु आजही अनेक शाळांमधील गोरगरीब आणि
गरजू मुलांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक
शाळांमधील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा अभावही शिक्षण घेण्यात अडथळा आणत
असतो त्यामुळे माझ्या शाळेतील आदिवासी वस्तीवरील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना
येत्या शैक्षणिक वर्षात मदत व्हावी आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा. या
उद्देशातून गरीब कष्ठकरी शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य लोकसहभागातून
मिळवण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विविध साहित्याचे होणार वाटप
आपल्या वस्तुरूपी वं आर्थिक मदतीतून विध्यार्थ्यांना गणवेश,नोंदवही,पुस्तके,अंकलिपी,पेन, चित्रकला वही, रंगपेटी,पट्टी, पेन्सिल,रबर,शार्पनर,खेळणी,वॉटर बॅग,शालेय दप्तर,असे विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही आणि त्यांचा शैक्षणिक विकास होऊ शकेल.
आपल्या वस्तुरूपी वं आर्थिक मदतीतून विध्यार्थ्यांना गणवेश,नोंदवही,पुस्तके,अंकलिपी,पेन, चित्रकला वही, रंगपेटी,पट्टी, पेन्सिल,रबर,शार्पनर,खेळणी,वॉटर बॅग,शालेय दप्तर,असे विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही आणि त्यांचा शैक्षणिक विकास होऊ शकेल.
आमच्या शाळेवरील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक
साहित्याची मदत व्हावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही यावर्षी राबवत आहोत.आपणही
या उपक्रमात शैक्षणिक साहित्य पाठवून या उपक्रमात सहभाग नोंदवावा.जेणेकरून आपणही
सेवाभावी कार्यात वाटेकरू होऊ शकतात.आपण दिलेली छोटीशी शैक्षणिक वस्तूही
विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत घेऊन जाईल त्यामुळे या उपक्रमासाठी आपण आपल्या ग्रुपमधील
तसेच आपल्या मित्र व नातलगानाही हा संदेश पाठवू शकतात.
सामाजिक ऋण फेडण्यासाठी गरजू आणि
गोरगरिबांसाठी या उपक्रमात आपण मदत करावी ही विनंती.आपण आपल्या शहरातील विविध सोसायट्या आणि इतर ठिकाणी
नागरिकांना हा
संदेश पोहोच करावा.आपण देखील सोशियल माध्यमातुन आवाहन करून, हे साहित्य गोळा करण्यास मदत करावी.
आजपासून (१ जुनपासून)पुढील पंधरा दिवस आपण आपली
मदत संकलित करावी.१६ जुन अथवा २३ जुन रोजी नाशिक शहरात येऊन आपली मदत आम्ही स्वता
घेऊन जाऊ.
कोणतेही
समाजकार्य समाजाच्या शुभेच्छा आणि सक्रिय सहकार्याने उभे राहते.आपल्यासारख्या
दातृत्वामुळे अनेक गरजूंना मदत मिळू शकेल
व आपल्याला समाधान.आम्ही घेतलेला हा वसा आपल्या सहकार्यानेच पुढे जाईल. त्याकरिता
आपण ही मदत करू शकता !
उपक्रमाविषयी अधिक माहिती आणि सहभागासाठी इच्छुकांनी,जिल्ह्यातील
इतरही दानशूर व्यक्तीं पुढील ९४२३९३२६९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही आपणास
करण्यात येत आहे.
संपर्क श्री.खंडु नानाजी मोरे प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर ता देवळा.जिल्हा नाशिक.
संपर्क नं-९४२३९३२६९८
एसबीआय,अकाउंट नंबर-३११२८३५८८४७
आयएसबीएन-SBIN0005126
No comments:
Post a Comment