सिलेब्रेटींबरोबर तर कुणीही धडपडतय सेल्फीसाठी ,पण हा सेल्फी परमोच्य आनंद व सुवर्ण क्षणांची साक्ष देणारा
कृतीशील शिक्षक महाराष्ट्रच्या चौथेराज्यस्तरीय शिक्षण संमेलन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे संपन्न झाले.ह्या संमेलनाचे अध्यक्ष कुलगुरू सन्मानीय ई.वायुनंदन साहेबांना दोन दिवस अनुभवले.राज्याच्या प्रमुख अशा विद्यापीठाचे कुलगुरू असुनदेखील संमेलन स्थळी तसेच कार्यक्रमातील त्याचं सहज वागण व सहकार्याची भावना आजपर्यंत एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून कधीही पहिली नाही.
विद्यापीठ परिसरातील सफाई कामगार,कामगारांची मुले ते विद्यापीठातील अधिष्ठाता शिक्षकांशी असलेल वागण.कुलगुरूंचे एकंदर वावर संवेदनशील व मातृवत्सल हृदय, समर्पणभाव प्रत्येकाच्या मनात घर करून गेला तो कायमचाच......कुलगुरू यांनी मॉर्निंगवॉक प्रसंगी मुक्त विद्यापीठ नाशिक कृषिविज्ञान केंद्रांतर्गत घेण्यात येत असलेली फळपिके,कुकुटपालन, शेळीपालन, रोपवाटिका,फुलशेती तसेच वनसंवर्धन अशा विविध बाबींची सखोल माहिती तसेच कृतिशील शिक्षकांचे कार्य पहात दोन दिवसीय संमेलन वं निवास शुल्क देखील या माणसाने माफ केले.त्याच बरोबर तुम्हा शिक्षकांना सोबत घेत काम करण्यास आवडेल असा विश्वास त्यांनी संमेलनातल्या एकंदरीत आढाव्यावरून दिला.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसंमाझ्या आयुष्यात जगतांना लाभली त्यातदूरशिक्षण पद्धती विकसित करत विद्यापीठात व व्यावसायिक संस्थांत या विद्यापीठाच्या शिक्षणाला समकक्षता मानल्या गेलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरू यांसोबत सेल्फी घेता आला. तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोचविण्याचे धोरण असलेल्या या विद्यापीटाचे कुलगुरू देखील आत्यंतिक ग्रेट स्वभावाचे दोन दिवसातील संमेलन स्थळावरील सहज वावरण्या वरून जाणवले.अशा ग्रेट व्यक्तीम्हत्वा बरोबरचा हा सेल्फी म्हणूनच माझ्यासाठी परमोच्य आनंद व सुवर्ण क्षणांची साक्ष देणारा ठरणारा आहे.
सिलेब्रेटींबरोबर तर कुणीही धडपडतय सेल्फीसाठी हा सेल्फी देखील मला आनंद देणारा ठरणार आहे.डॉ ई वायुनंदन यांच्या कामाचा आवाका पाहिल्यावर सरांना सलाम करावासा वाटला.वं त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.धन्यवाद कृतिशील शिक्षक समूहाचे संयोजक माणूस जोडणारा व माणुसकी पेरणाऱ्या विक्रमदादा वं शिक्षण संमेलनामुळे हा योग जुळून आला.
Great to read about hon'ble Chancellor Sir and a great leader Vikram Sir. Goodness is still alive..
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteअभिनंदन भाऊ
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन
ReplyDelete