Sunday, May 26, 2019

कृतीशील शिक्षक महाराष्ट्र या शिक्षक समूहाचे राज्यस्तरीय चौथे शिक्षक संमेलन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे संपन्न खंडू मोरे,नाशिक पुण्यनगरीतुन...


कृतीशील शिक्षक महाराष्ट्र या शिक्षक समूहाचे राज्यस्तरीय चौथे शिक्षक संमेलन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  येथे संपन्न 

खंडू मोरे,नाशिक  पुण्यनगरीतुन...

 राज्यातील कृतीशील शिक्षक महाराष्ट्र च्या वतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या प्रागंणात दोन दिवशीय राज्यस्तरीय शिक्षण संमेलनास दिनांक २४ मे रोजी प्रारंभ झाला. मोनाली देशमुख,अनुराधाताई व साविताताई यांनी अतिशय सुरेख असे स्वागतगीत सदर केले.
उद्घाटन सत्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे कुलगूरू ई वायुनंदन ,सीसीआरटी नवी दिल्लीचे समुपदेशक डॉ.हितेश पानेरी, जेष्ठ व्याख्याता डॉ. कविता साळूंके,राज्य समन्वयक विक्रम अडसूळ,ज्योती बेलवले प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
          अध्यक्षपदी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे कुलगूरू ई वायुनंदन यांची निवड करण्यात आली. मुक्त विद्यापिठाचे कुलगूरू ई वायुनंदन व मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी गटाच्या वतीने  प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.ज्ञानदेव नवसारे यांनी संमेलनाचे प्रास्ताविक सदर केले.एटीएम विषयी विक्रम अडसूळ यांनी विशेष माहिती सदर केली.
जेष्ठ व्याख्याता डॉ. कविता साळूंके, ज्योती बेलवले यांनी मनोगत व्यक्त केले.
मा हेमंत दाजी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष बी वायुनंदन यांचा परिचय करून दिला. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. वंचितांच्या शैक्षणिक विकासासाठी कृतीशील शिक्षक कार्य करत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सदैव सहकार्य करेल असे आवाहन कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांनी केले.
        पहिल्या सत्रात संमेलनाच्या पहिल्या दिवशी सीसीआरटी नवी दिल्लीचे समुपदेशक डॉ.हितेश पानेरी यांचे भारतीय संस्कृती व शिक्षण या विषयावर समुपदेशन सत्र संपन्न झाले.शिक्षक हे ब्रिजचे काम करतात.भारतीय संस्कृती,संस्कृतीची गरज,संस्कृतीकडे पाठका झाली आहे.भारतीय संस्कृती जगात महान का आहे?. संस्कृतीचा आधार,भारताची भौगोलिक रचना व जगाच्या भूमीवरच्या रचना सारखी आहे.अध्यात्माचा विकास हा भौगोलिक स्थितीमुळे झाला आहे.दृश्य कला,प्रदर्शन कार्यकला,धार्मिक कला विशद केल्या.सिंधू संस्कृती जे मिळाले ते आजही आपल्या संस्कृती टिकून आहे.हे विविध दाखले देत त्यांनी विशद केले.            
           एटीएमचे शिक्षक हे व्यवस्थेत गेल्यावर शंभर शिक्षक तयार करतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतातील मंदिरांची रचना,त्याचबरोबर संस्कृतीचे तत्व ही फक्त महाराष्ट्रात जिवंत आहेत असे मत त्यांनी यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विशद केले.
                  त्यानंतर पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रात उपक्रमशील शाळा या सदरात संदीप पवार जरेवाडी बीड यांनी जरेवाडीची यशोगाथा सदर केली.शाळेत गावातील ५५ विध्यार्थी व इतर ३५ किमी अंतरावरून येणारे असे ६५० पटसंख्या असणाऱ्या शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची शाळा स्तरावर सुरु असलेया नाविन्य व गुणवत्ता वाढीसाठीची उपक्रम या माध्यमातुन महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा घडवण्यामागील शिक्षक,ग्रामस्थ,समाज ,सामाजिक संस्था यांचे योगदान यावेळी विषद केले.एबीबी माझा च्या माझाकट्टा या कार्यक्रमात शाळेला सादरीकरणाची संधी या गोष्ठी यावेळी विषद केल्या.
            किरण गायकवाड ठाकरवाडी,गेवराई यांनी २७ मुल असलेली शाळा ७२ मुलांपर्यंत नेली.१३०५ झाडे,शैक्षणिक,गोष्टी,मेकपबॉक्स,कमांडो पथक,१००० पुस्तकांचे वाचनालय,बंजारा पथकप्रकाश वाटा ह्या चित्रपटातुन प्रेरणा घेत विविध नाविन्यपुर्ण उपक्रमातुन शाळेचा केलेला विकास कथन केला.
                    संदीप शेजवळ पांडववाडी येवला,नाशिक या निमशिक्षकाने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शाळेचा केलेला बदल.गुणवत्ता वाढीसाठी दिलेले योगदान,मुलांची गुणवत्ता ३ रिचा मुलगा एमएससीआयटी पास करत २ दिवसात ४० हजाराचा संगणक मिळवला,सोलर सिस्टीम असलेली शाळा,पोषण आहार भोजनालयगृह अशी वेगवेगळी उपक्रमातून शाळा विकास त्यांनी विषद केली.
              लहू बोराटे भारजवाडी यांनी आपल्या सादरीकरणात शाळेतील २ ते ४ मुले असलेली बंद असलेली शाळा कशी सुरु केली.५ हजार रुपये घेऊन शाळेत प्रवेश व त्यातुन शाळा विकासासाठी निधी जमवण्याचा फंडा,शाळेस ९ लक्ष लोक सहभाग मिळवत शाळेचा केलेला विकास,झाडे.विविध उपक्रम त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमातुन विषद केलेत.
                    सचिन सूर्यवंशी उस्मानाबाद या अवलियाने शाळेसाठी आपली तिन एकर शेती विकली.व त्या पैशातून येणारा ११ हजार व्याजातून शाळेसाठी खर्च करणारा,शाळांच्या सुविधांसाठी १ रुपया गोळा करत सव्वाशे कोटी जमा करण्याचा उद्देश असणाऱ्या या अवलियाने संपूर्ण सभागृहास जिकून घेतले.शिक्षण सप्ताह सुरु केला.स्मशान भुमीत वृक्षारोपण केली.२३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवुन शाळांना मदत करण्यासंबंधी आवाहन ह्या शिक्षकाने केले.
             या सर्व  शिक्षकांनी शाळा स्तरावर राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळेस विषद केले.शाळा उभी करताना कामातून,पालक,ग्रामस्थांना विश्वास निर्माण केला.व गाव समाज सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळा कशा पद्धतीने भौतिक व गुणवत्तापूर्ण वेगवेगळ्या उपक्रमातून केल्यात हे यावेळेस सर्वच शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातुन विषद केल्या.
                     ह्या शिक्षकांचे कार्य पहात सभागृह सर्वाना मनापासुन दाद देत सर्वांचेच कौतुक केले.अतिशय प्रतिकुल परिस्थिती केलेल्या कामातुन सभागृहातील प्रत्येक शिक्षकाने संदीप पवार सर जरेवाडी शाळा ता.पाटोदा,लहू बोराटे सर - भारजवाडी शाळा,अहमदनगर,किरण गायकवाड सर ठाकरवाडी शाळा ता.गेवराई,संदीप शेजवळ सर पांडववाडी शाळा ता.येवला,सचिन सुर्यवंशी सर देऊळगाव शाळा ता.परांडा यांच्या शैक्षणिक कार्यातुन प्रेरणा घेत नव्या शैक्षणिक वर्ष्याची गाठ बांधली.
            राज्यभरातील महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातील शिक्षकांची कार्य माझ्या समृध्दीच्या..प्रगल्भीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होत्या.या सर्व शिक्षकांकडून कितीतरी गोष्टी शिकता आल्या.या सर्वांचं जमिनीवर राहून,प्रसिध्दी परान्मुख अखंड सुरू असलेलं शैक्षणिक गुणवत्तेचं काम अनुभवता आलं.या सगळ्यांच्या कामामागची तळमळ..जिद्द..प्रेरणा या संमेलनातून मला ठायीठायी जाणवली.
                       दुपारच्या सत्रात माझा प्रेरणा दाई प्रवास या सदरात विशेष शिक्षक सुरेश धारराव निफाड नाशिक, सोपान खैरणार मोरेनागर नाशिक व  राहुल भोसले कोल्हापूर यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास सादर केला.या तिनही शिक्षकांनी आपला प्रेरणादाई प्रवास उलगडताना सभागृहातील प्रतेक शिक्षकाच्या डोळे डबडबलेत.अनेक शिक्षक ह्या त्रिमूर्तीच्या प्रवासाच्या घटना ऐकताना पाणावलेले डोळे हळूच रुमालाला पुसतांना मी कॅमेऱ्यात पकडलेत.सोपान खैरनार यांनी वडिलांचे स्वप्नपुर्ती.
             सुरेश धारराव यांनी बहिण व कुटुंबियांचा त्यांच्या सुखासाठी घेतलेले कष्ठ व राहुल भोसले सरांनी आपल्याला सिद्ध करण्यासाठी स्वताला समृद्ध करण्यासाठी घेतलेले कष्ठ ऐकताना संपूर्ण सभागृह थिजल्यागत अवस्था अनुभवली.त्यांना पारंगत असलेल्या कला मोजतांना अख्ख्या सभागृहाने मनगटा पर्यंत अख्खा हात तोंडात गिळलेला अनुभवला.अवघं सभागृह आपलेसे केले या तिघा प्रेरणास्रोतांनी...हास्य आणि अश्रूंचा सुंदर मिलाप....ह्या शेषन चालू असतांना अनुभवला.!
                 पुढील सत्रात
मुलांसाठी प्रकटवाचन का व कसे? - बाळासाहेब लिंबीकाई यांनी ह्या सदरात आपल्या मुलांनी काय वाचावे.मुलांशी पालकांचे घरातील वागन त्या भोवती घरात वातावरण कसे असावे.पुस्तकाचे वाचन कशासाठी करावे हे मांडताना पुस्तक वाचल्याने आनंद मिळतो.पुस्तकाची मजा अनुभवायला मिळते.मुलांना लहानपणापासुन वाचून दाखवणे हाच वाचनातील परिपूर्ण यश मिळवण्यासाठीचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी वेगवेगळे उदहरणे देत विषद केले.वाचून दाखवणे परिणामकारक शिक्षणाचा एक सर्वात सुलभ स्वस्त आणि जुना मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.


                        सायंकाळच्या सत्रात  शिक्षक प्रगल्भीकरण एक प्रवास ह्या सदरात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर  यांनी  डिझाईन फाँर  चेंज ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रातील कृतिशील शिक्षकांसमोर मांडली.नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्वांकडून केले गेले.YCMOU चे कुलगुरू ई वायुनंदन तसेच कार्यसन अधिकारी, शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.प्राची साठे मॅडम मराठीशाळाप्रेमी ,भाषाभ्यासक मॅक्शीन मावशी, हितेश पनेरी CCRT इतिहास प्रमुख यांनी सर्वांनी नाशिक जिल्ह्यातील या संकल्पनेचे कौतुक केले.संपूर्ण सभागृहाला झनकर मॅडमसारख्या अधिकारी आमच्या मार्गदर्शक असल्याचा अभिमान वाटला.नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्वांकडून केले गेले.
                         मा.सुलभा वटारे गटशिक्षणाधिकारी,पंढरपूर यांनी शिक्षकांनी संवेदनशीलता जपली पाहिजे.व आपल्यातील कॉलिटीज मोजायला शिका आपोआप आपल्यातून चांगल भाहेर पडेल असे मत व्यक्त केलं.शिक्षकांनी भन्नाट असावं प्रत्येक कला येण्यासाठी त्याच बरोबर समाज कधीतरी  चांगल्या गोष्ठीचं कौतुक करतीलच त्यामुळे तुम्ही करत राहील पाहिजे असा सल्ला यावेळी शिक्षकांना दिला.लेकर शिक्षकातील संवेदनशिलता जागी ठेवतात त्यामुळे निष्पाप व निरागस मुलांना जवळ घ्या हा उपक्रम राबवा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
                               रात्रीच्या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री यांच्या कार्यसन अधिकारी मां प्राची साठे यांची प्रकट मुलाखत कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे संयोजक विक्रम अडसूळ व ज्योती बेलवले यांनी घेतली.शिक्षिका ते कार्यासन अधिकारी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य येथ पर्यतचा प्रवास उलगडून दाखवला.बालपण,कुटुंबीय,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व तेथील शिक्षक,बालपणातील किस्से,महाविध्यालयीन शिक्षण,विवाह,कुटुंबाकडून मिळणारा सपोर्ट शिक्षिका म्हणुन करत असलेले कार्य,त्या काळातील प्रसंग अतिशय मनमोकळे पणाने उलगडून दाखवला.विविध अंगाच्या प्रश्नांच्या माध्यामतून मुलाखत कारांनी हात घातला.  
                               विध्यार्थ्यांना देता देता तुम्हीही समृद्ध होतात.त्यामुळे तुम्हाला वाट्टेल ते करा पण ते उत्तम झाले पाहिजे अशी तुमची धारणा असावी असे त्यांनी शिक्षकांना संबोधताना केले.प्रज्ञा,प्रतिभा,दिव्य जेथे आहे तेथे जाऊन ज्ञान घेण्याची माझी भूक होती.म्हणुन मी तन्मय तेणे शिकत होते.यामध्ये शासकिय शैक्षणिक धोरणे व आगामी काळात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.प्रकट मुलाखतीतून त्यांनी प्रश्नांना उत्तरे देत शिक्षकांशी साधलेला संवाद रात्री नऊ वाजेपर्यंत शिक्षकांनी आनंदाने अनुभवला.
               उपशिक्षणाधिकारी एल डी सोनवणे,निफाडच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप,गटशिक्षण अधिकारी किरण कुंवर,पंढरपूर च्या गटशिक्षणाधिकारी सुलभा पठारे यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.रात्री सर्व संमेलनाच्या वारकऱ्याना आमरस पोळीचे गोड जेवण देण्यात आले.
               कृतिशील गटाच्या सदस्या स्व.कल्पनाताई महाडिक ह्यांच्या नावाने सुरु केलेला कवीकट्टा रात्री साढेदहा ते दिड पर्यंत सुरु होता.महाराष्ट्रातील शिक्षकांची कवीकट्ट्यात धमाल धमाल केली...!कवी मित्र हंसराज भैया देसाई यांनी अतिशय खुमासदार संचालन करत ह्या कट्ट्यावर राज्यातील अनेक बंधु भगिनींनी  अभंग,कविता,आई,दुष्काळ,गजलांचा पाऊस...धो धो कोसळला.

रविवारी संमेलनाच्या दुसर्या दिवशी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन यांच्या समवेत एटीएम  परिवार मॉर्निंग वॉक व विद्यापीठ  परिसर भेट यात्रा आयोजन केली सकाळी साढे सहा वाजता स्वतः कुलगुरू सोबत अख्खा विध्यापिठ परिसर सगळ्यांनी पायाखाली घातला...!मोठी माणसं किती साधी असतात याचा परिचय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन यांच्या शिक्षकांसोबत सहज वागण्यातुन शिक्षकांना जाणवला.

    संमेलनाच्या दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात भाषा अभ्यासक मक्सीन बर्नसन  (मॅक्शिन मावशी)यांच्या सक्षम माणसांना घडवण्यासाठी मातृभाषेचे स्थान ह्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.समाधान सिकेतोड यांनी मावशींच्या कार्याचा परिचय दिला.जग झपाट्याने बदलत चालले त्यामुळे तुमच्या जीवनात दोन चार वेळेस तुमचा व्यवसाय बदलावा लागेल म्हणून या अनिश्चित भविष्यासाठी काहीतरी तयारी करण्यासाठी सक्षम माणूस हवा आहे.येणाऱ्या भविष्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम माणसं हवी असतात हे माणसं तयार करण्याचे काम शिक्षक करत आहेत.
             आकलन होणाऱ्या भाषेतुन ज्ञान घेत शिक्षकांनी सक्षम माणुस घडवण्यासाठी भाषा का व कशी महत्वाची आहे हे त्यांनी वेगवेगळ्या दाख्ल्यानी स्पष्ट केले.फलटण येथे प्रगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मॅक्सीन मावशी यांनी भाषा शिक्षणाच्या बाबतीत केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव कथन केले.
१९६१ साली अमेरिकेतुन महाराष्ट्रात येऊन,इंथली भाषा,संस्कृती त्यांनी समजून घेतली.वंचित घटकातील मुलांसोबत काम केले.हा संपूर्ण प्रवास त्यांनी ओघवत्या शैलीत सांगुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्त्व,मराठी साहित्याचा दांडगा व्यासंग पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
          जन्माने जरी अमेरिकन असल्या तरी यांचे  अस्खलित व अचूक मराठी हे मराठी माणसाला लाजवनार जाणवलं.भारतालाच आपली कर्मभूमी मानून भारतीय नागरिकत्व घेतलेल्या, शिक्षण तज्ञ , भाषा अभ्यासक, मराठीवर विशेष प्रेम असणाऱ्या व तळागाळातील समाजाला मागासलेपणाच्या अंधारातून प्रगतीची वाट दाखवणाऱ्या डॉ. मक्सीन बर्नसन ८४ वर्षी देखील विना चष्मा वाचन व सकाळची फ्लाईट चुकल्यावर,पुन्हा दुसऱ्या फ्लाईट ने शिर्डी व तेथुन गाडीने प्रवास करत नाशिक पर्यंत ते हि अवघ्या ८४ व्या वयात विध्यार्थीसेवेचं ब्रीद घेऊन उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न शिक्षकांशिक्षकामध्ये पेरणार आभाळाच्या उंचीच व्यक्तीमहत्व अख्या सभागृहाला दोन दिवस संमोहित करून गेल.
                    दुपारच्या सत्रात माझा वेगळा उपक्रम या विषयावर भेकरेवाडी जिल्हा रायगडचा शैक्षणिक अंधार भेदणारा 'दिवा'!वेच्या गावित भेकरेवाडीचा प्रवास उलगडताना वेच्याने रायगड व तेथील शाळा प्रसंग जसाचा तसा सहज भाषेतून उभा केला.मुलाएवढा गुरुजी ते अख्या महाराराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या पुस्तक भिशी उपक्रम सध्या या भिशीचे सभासद.आजवर ४४ भिश्या झाल्यात.ह्या उपक्रमाचे ओझरते वर्णन चित्र उभं करणार ठरलं.'वेच्या म्हणजे चांगले तेवढे वेचणारा...! त्याने तुडवलेल्या पायवाटेचा आता रस्ता झाला आहे.हा प्रवास जाणुन घेतांना सर्वच भारावून गेलेत.
                       महाराष्ट्राचे पहिले बालरक्षक जगदीश कुडे यांचा शाळा उभी करण्याचा प्रवास गावाशी झालेला संघर्ष व त्या संघर्ष्यातून राज्याला आदर्शवत काम करून दाखवणाऱ्या व कुणाच्याही खिजगनितात नसणाऱ्या श्रीरामतांडा जिल्हा जालना शाळेचे शिक्षक जगदीश कुडे यांचा मुलं समजून घेत शाळेचे उपक्रम व विध्यार्थी गुणवत्ता थक्क करायला लावणारी ठरली.माणसाने शरीर एष्टीवर जाऊ नहे अशी हि जगदीश सर व वेच्या अख्या सभागृहातील माणसाच्या रुधयावर राज्य करून गेलीत.
                            नाशिक जिल्ह्याची शान इंग्लीश गुरू प्रदीप देवरे सर यांनी इंग्रजी विषयात शाळेत व विध्यार्थ्यात राबवलेले विविध गुणवत्तेचे उपक्रम अचंबित करणारे ठरलेत.प्रदीप देवरे सर संपूर्ण महाराष्ट्रा साठी इंग्रजी विषयावर प्रोजेक्ट देणार आहेत.ह्या उपक्रमावर केलेले संशोधन व शैक्षणिक प्रवास त्यांनी विषद केला.
            लेझीम किंग लक्ष्मी ईडलवार यांनी शाळा स्तरावरील उपक्रम व नुसत्या लेझीमने अख्या महाराष्ट्रात दिलेली ओळख याचा प्रवास विषद केला.शिक्षणाची वारी व वारीत लेझिम तसेच अनुभव शिक्षकांना कथन केला.
            गणितमित्र हि संकल्पना अख्या जिल्ह्यासह राज्यात राबवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारा वाल्मिक चव्हाण सर नाशिक जिल्ह्यात गणितमंत्रा व गणित विषयासाठी करत असलेले कार्य अख्या सभागृहाने एक एक शब्द वेचत रुदयात साठवले.गणित विषयांची भीती शिक्षक व मुलामधुन कमी व्हावी यासाठी करत असलेले काम झपाटल्यागत वाटलं.
        पूजा पाटील यांनी आपल्या शाळेतील मुलींचे केलेल्या स्काउट पथक.ह्या पथकातून झालेली राज्यभर ओळख,विध्यार्थी व शिक्षकांना मिळालेला सन्मान,व विविध उपक्रम यावेळी जाणुन घेतलेत.सारिका बद्दे यांच्या माझे सूर्योदयी उपक्रमात प्रश्नमंजुसा,सूर्यमाला,जलचक्र,वनस्पतीचे अवयव ,खेळ व महिला खेळाडू हि वेगवेगळी उपक्रम यावेळी सादर केलीत.
                    निसर्गमित्र तुकाराम अडसुळ यांच्या कार्याचा परिचय यावेळी सभागृहाला त्यांच्या शाळा स्तरावर सुरु असलेल्या उपक्रमांनी झाला.आपल्या तालुक्यातील प्रेरक शिक्षकांच्या याशोगाथेचा गुरुवर्य विशेषांक व शाळा स्तरावरील नाविन्यपुर्ण उपक्रम अनुभवास मिळालेत. माझं काम अधिक चांगलं कसं होईल..व इतर यातुन कशी प्रेरणा घेतील. या वर्षी अजून नवनविन काय करता येईल. माझे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण कसे शिकतील सतत हा ध्यास या सर्वांच्या बोलण्यातसादरीकरणात दिसत होता.
              समारोपाच्या चौथ्या सत्रात डॉ.ई.वायुनंदन कुलगुरू (YCMOU,NASHIK) यांनी शिक्षकांच्या ह्या संमेलनाचे दोन दिवसातील कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वाना पुढील कार्यासाठी शुभेछ्या संदेश दिला.
          डॉ.किरण मोघे (उपायुक्त माहिती कार्यालय नाशिक)यांनी आपल्या मुलांना समृद्ध करण्यासाठी घरातील निकोप वातावरण,विध्यार्थी व कार्याप्रत तत्पर राहण्यासाठी शिक्षकांनी समर्पण भावनेने योगदान देण्यासाठी प्रयत्न करण्याचे विषद केले.विशाल तायडे (बालसाहित्यिक तथा एटीएम च्या पहिल्या  साहित्य संमेलन अध्यक्ष यांनी शिक्षण संमेलनास सुरु असलेल्या सुभेछ्या दिल्या.
डी.डी.सुर्यवंशी,जेष्ठ अधिव्याख्याता संगमनेर व मार्गदर्शक एटीएम यांनी शिक्षकांच्या समृद्धीसाठी सुरु असलेल्या या संमेलनाचे कौतुक केले.आपल्या कामातुन सर्व सदस्य उमटवत असलेला ठसा त्यांनी वेगवेगळ्या घटनातून विषद केले.गटाच्या उर्जस्वल वाटचालीस शुभेछ्या दिल्या.गटाविषयी आपुलकीची भावना राज्यभरातील तमाम शिक्षक बंधुभगिनींना भावली.प्रा.विजयकुमार पाईकराव प्राध्यापक मुक्त विद्यापीठ यांनी विद्यापीठ स्तरावर सुरु असलेले उपक्रम व इतर बाबीविषयी मार्गदर्शन केले.
                               विक्रम अडसूळ राज्यसंयोजक यांनी मुक्तविद्यापीठाच्या अगणित अश्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.ह्या सत्राचे संचालन जयदीप गायकवाड,श्रीबिवास एलाराम यांनी अतिशय सुरेख रित्या केले.नारायण मंगलराम सहसंयोजक यांनी तमिळ,हिंदी व मराठी भाषेतुन दोन दिवस व महिन्या भरापासून धावपळ करणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.
                                       नाशिक येथे संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्ञात,अज्ञात या सर्वानी आपल्या घरचं कार्य असल्यागत धावपळ केली.नाशिकर माउली,हेमंतदाजी,गजानन उदार,विलास गवळे,रामदास शिंदे,मोनाली देशमुख,विलास जमदाडे,प्रदीप देवरे,नामदेव बेलदार,प्रकाश चव्हाण,अनुताई,विश्वास पाटोळे सर,रमाकांत जगताप सर,जयदीप,हंसराज भैया,जावेदभाई,शशांक सर सविता पारखे,भरत पाटील,रोहीणीताई,सोनवने सर या सर्वांची धावपळ संमेलन व्यवस्थेविषयी तोंडभरून कौतुक करणाऱ्या राज्यभरातील बांधवांच्या कौतुकाने सार्थकी लागली.
               विक्रम दादा,नारायण मंगलाराम सर,माउली,ज्योती ताई व वेगवेगळ्या सत्रांचे संचलन करणाऱ्या सर्व बंधुभगिनींनी अतिशय खुमासदार शैलीत वेगवेगळ्या सत्रांचे संचलन केले.सहभागी सर्व शिक्षकांनी अतिशय शिस्तपुर्ण व दोन दिवसात संमेलन यशस्वी घेण्याच्या उद्देश्याने संयोजकांना कुठलाही शिस्तीचा बडगा न उगारता शिस्तीचे प्रदर्शन घडवले त्यामुळे विद्यापीठ व परिवार आयुष्यभर आपल्या गटाच्या कार्यक्रमाच्या  या दोन दिवसाच्या स्मृती चिरंतर ठेवतील ह्या सहकार्या बद्दल राज्याच्या कानाकोपऱ्यातून विक्रम दादाच्या विशावासावर आलेल्या आपणा सर्वांचे मनापासुन आभार.
         मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत दरवर्षी होणारे कृतीशील शिक्षक महाराष्ट्र या शिक्षकांच्या समुहाचे शिक्षकांना समृध्द करणारे चौथे शिक्षक संमेलन आपल्या सहकार्याने अतिशय आनंददायी वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांविकासाच्या तळमळीतून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अविरतपणे कार्यरत असणारे शिक्षक ह्या संमेलनात भेटलेत.हे शिक्षक संमेलन म्हणजे ज्ञानाचा..विचारांचा..स्नेहांचा..आनंदाचा..सतत कार्यप्रणव असणा-या कर्मयोग्यांचा महोत्सवच..होता.असाच मानावा लागेल.
           महाराष्ट्राच्या काना कोपर्यात असणारे कार्यरत शिक्षकांचे काम त्यांच्या सोबत असण्याने जवळून पहाता आले.एटीएमची सगळीच टिम म्हणजे भन्नाट..
उर्जस्वल..आनंददायी आणि लेकरांसाठी कायपण म्हणत अविरतपणे कार्यमग्न असणारी ही सगळी मंडळी म्हणजे या संमेलनाचे वैभव होते.
              कृतीशील शिक्षकांचे हे संमेलन माझ्यासाठी सदैव संस्मरणीय आणि खूप काही शिकवून जाणारे ठरणार आहे. काम करणा-यां कर्मयोग्यांची ही मांदियाळी म्हणजे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रच्या नव्या निर्माणाची उर्जा आणि प्रेरणा आहे.
मोठ्या जड अंतकरणाने लवकरच भेटण्याच्या बोलीवर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला........संमेलन आपल्या सर्वाना पुनपुन्हा अनुभवता याव म्हणुन हा प्रपंच.आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद........ 
खंडु मोरे,फांगदर नाशिक ९४२३९३२६९८.

10 comments:

  1. खंडूदा ,
    सलाम तुमच्या लेखनीला..... .
    सर्व संमेलन पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा केलेत .... .

    ReplyDelete
  2. दादा...संपूर्ण संमेलन डोळ्यासमोर उभे केले...
    ग्रेटच

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर संमेलन आणि तितकेच समर्पक शब्दांकन..👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. शिक्षण संमेलन विषयी वस्तुस्थिती विवेचन अप्रतिम केले ,संमेलनातून काय घेतले याबाबत शब्दांकन उत्कृषटरित्या केले आहे.

    ReplyDelete
  5. संपूर्ण संमेलन डोळ्यासमोर उभे केले व पुन्हा एकदा त्या दोन दिवस प्रत्यक्षात पुन्हा अनुभवयास मिळाले असे वाटले.लेखन अप्रतिम
    आपला राहुल आठरे नेवासा जि अहमदनगर

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर संमेलन आणि तितकेच समर्पक शब्दांकन..👌👌👌

    ReplyDelete
  7. खंडू दा., अप्रतिम शब्दांकन...👌👍

    ReplyDelete
  8. शब्दांचा जादूगार

    ReplyDelete
  9. जितक्या वेळा वाचू तितक्या वेळा संमेलन पुन्हा डोळ्यासमोर उभे राहते...अप्रतिम लेखन दादा

    ReplyDelete
  10. खूपच सुंदर राजे

    ReplyDelete