पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे,परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक निकम,गोपनीय अभिलेक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे आदि यावेळी उपस्थित होते.
देवळा पोलीस स्थानकाच्या वतीने पोलिस दल स्थापना दिन (रेझिंग डे) आज तालुक्याच्या शेवटच्या गावाच्या आदिवासी वस्तीवरील फांगदर(खामखेडा) प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे यांनी पोलीस दलाकडून वापरली जाणाऱ्या हत्यारांची ओळख करून ते विध्यार्थ्यांना हाताळण्यास दिली.विध्यार्थ्यांना एसएलआर रायफलविषयी मार्गदर्शन केले.बुलेट,मॅगजीन,गण लोडिंग,फायरिंग,पिस्टल व त्याचे बुलेट,अश्रूधुर नळकांडे,लाठी व लाठी चार्ज,बेड्या याविषयी विध्यार्थ्यानी विचारलेल्या शंका,प्रश्नाविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉग स्क्वॉडसह इतर स्क्वॉडबाबतही माहिती या वेळी विध्यार्थ्यांना देण्यात आली.
रेझिंग डे निमित्ताने विध्यार्थ्यांना पोलिसांचे कर्तव्य,भुमिका,समाजातील स्थान याविषयी माहिती दिली.पोलीस हे आपले मित्रच असतात.कुठलेही दडपण न ठेवता आपल्या तक्रारी त्यांच्याकडे मांडल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना कार्यक्रमात पोलिसांच्या विविध विभागाची माहिती, व पोलिसांच्या दैनंदिन कामाकाजाची,पोलीस दलाविषयी सविस्तर माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी देऊन रेझिंग डे शाळेत उत्साहात साजरा केला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे यांनी पोलीस दलाकडून वापरली जाणाऱ्या हत्यारांची ओळख करून ते विध्यार्थ्यांना हाताळण्यास दिली.विध्यार्थ्यांना एसएलआर रायफलविषयी मार्गदर्शन केले.बुलेट,मॅगजीन,गण लोडिंग,फायरिंग,पिस्टल व त्याचे बुलेट,अश्रूधुर नळकांडे,लाठी व लाठी चार्ज,बेड्या याविषयी विध्यार्थ्यानी विचारलेल्या शंका,प्रश्नाविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉग स्क्वॉडसह इतर स्क्वॉडबाबतही माहिती या वेळी विध्यार्थ्यांना देण्यात आली.तालुक्यातील छोट्याश्या वस्तीवरील प्राथमिक शाळेत पोलीस स्थानकाच्या वतीने रेझिंग डे निमित्ताने कार्यक्रम घेतल्याबद्दल मुख्याध्यापक संजय गुंजाळ यांनी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व पोलीस स्टेशनचे आभार मानले.शिक्षक खंडू मोरे यांनी सुत्रसंचालन केले.
आदिवासी शेतमजुरांच्या वस्तीवरील प्राथमिक शाळेत विध्यार्थी विकासासाठी राबवले जात असलेले नाविन्यपुर्ण उपक्रमामुळे तालुक्याच्या आदिवासी वस्तीवरील शाळेत रेझिंग डे साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे देवळा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.
पोलिस स्थानकाच्या ह्या शाळा भेटीतुन विध्यार्थ्यानी पोलिस आपला मित्र असतो.कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या ह्या घटकाला जवळुन पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे.विद्यार्थ्यांची जिज्ञसा वृत्ती त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून दिसुन आली.पोलिस ते देखील आपल्या शाळेवर पहायला मिळालेत.पोलिस वापरत असलेले हत्याराना हाताळायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे गारुड शाळा सुटेपर्यत अनुभवायला मिळाले.
No comments:
Post a Comment