Tuesday, October 30, 2018

आमच्या शाळेचे वैशिष्टे


1.      शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर
2.      शाळेची स्थापना : २ जुलै २००१
3.      शाळेचे ब्रीदवाक्य : धरूया शिक्षणाची कास करूया वस्तीचा विकास
4.      पत्ता: मु. मु.पो.खामखेडा ता.देवळा.जिल्हा-नाशिक.
5.      महसूल गावाचे नाव :- खामखेडा
6.      शाळेचे केंद्र :- खामखेडा
7.      शाळेचा प्रवर्ग :- १ ली ते ४ थी
8.      शाळेचा EMIS संकेतांक क्रमांक : २७२००३०२१०४
9.      शाळेचे वर्णन :-
1.      सर्व शिक्षा अभियान यांच्या वतीने   आरसीसी बांधकाम
2.      जि.प. शाळा उत्तर-दक्षिण  असुन शाळा पूर्वाभिमुख आहे.
3.      वर्गखोल्या:२  खोल्या
4.      ऑफिससुविधा आहे.
5.      स्वच्छतागृह:मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १ युनिट (२ + १TOILET)
6.      अपंगासाठी रंप सुविधा आणि कमोड TOILET सुविधा
7.      खेळाचे साहित्य: ढोल,खंजिरे, दोरीउड्या, बॉल, चेंडू, कार्यानुभावाचे साहित्य,लेझीम,डम्बेल्स,टिपरी निशाण कवायत साहित्य आहे.
8.      प्रयोगशाळा: छोटे-छोट्या प्रयोगासाठीचे साहित्य उपलब्ध आहे.
9.      बाग:अतिशय सुंदर बाग आहे.बागेत औषधी बगीचा असून तीनशेहून अधिक झाड लावलेली आहेत.
10.    पिण्याचे पाण्याची टाकी:आहे मुबलक पाणी व्यवस्था (२ टाक्या)आहेत.
11.    मैदान: आहे .मैदानावर पेवर ब्लॉक असून सर्वांग सुंदर मैदान आहे.त्यात घसरगुंडी, सी-सॉ,झोपाळा  मनोरा इ. शैक्षणिक साहित्य: आवश्यक:आहे
10.    शाळेतील विद्यार्थी संख्या : मुले – २८   मुली-२३ आणि एकूण-५१
11.    शाळेतील शिक्षक/कर्मचारी संख्या : दोन २
12.    शाळेमार्फत देण्यात येणारी सुविधा/ वैशिष्ट्ये :
1.      विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे अध्यापन.
2.      प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी
3.      परिसर क्षेत्र भेट सहली
4.      पिण्यासाठी स्वच्छ पाणी
5.      संगणकाचे शिक्षण चार संगणक,प्रोजेक्टर,स्मार्ट बोर्ड च्या सहाय्याने अध्यापन केले जाते.
6.      शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दर्जेदार पोषण आहार,स्वतंत्र स्वयंपाक गृह.
7.      इ-लर्निंग सॉफ्टवेअर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण.
8.      पालक मेळावा आयोजन पालकांचे प्रबोधन केले जाते.
9.      तज्ञ व नामांकित मान्यवरांचे शाळा भेट व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन.
10.    विद्यार्थ्यांचा  कलागुणांना वाव विध्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न.
11.    विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्था,दानशूरांकडून शैक्षणिक साहित्याची उपलब्धता.करून देण्यात येते.
1.      शाळेला मिळालेले महत्वाचे ठळक  पुरस्कार :
1.      शैक्षणिक वर्ष २०१५ -१६ राज्यशासनाच्या मूल्यमापनात शालेस गुणवत्तेचा दर्जा प्राप्त व तालुका स्तरीय गुणवत्ता विकासात तृतीय क्रमांक.
2.      शैक्षणिक वर्ष २०१७/१८ –नाशिक जिल्ह्यातील किनो एजुकेशन संस्थेच्या वतीने  जिल्हा स्तरीय आदर्श  आदर्श शाळासन्मान चिन्ह व बक्षीस  प्राप्त.
3.      लोकमत समूहाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकात झेडपिच्या डिजिटल शाळा ह्या लेखात शाळेच्या उपक्रम अडीच लाख प्रतींचा खप.
4.      संतोष सोनवणे लिखित गुरुमंत्र ह्या राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या लेखाजोखा ह्या पुस्तकात शाळेची यशोगाथा.
5.      लोकसत्ता ह्या दैनिकाच्या आठवड्याची शाळा ह्या सदरात शाळेच्या उपक्रमांची दखल.
6.       


Tuesday, March 13, 2018

सलाम दिंडोरीतल्या सखुबाई व मुंबईतल्या मनश्री पाठक या दोघींना.


सलाम दिंडोरीतल्या सखुबाई व मुंबईतल्या  मनश्री पाठक या दोघींना.

                               सूर्य आग ओकत होता... चालून चालून पाय सुजले होत... पायाला आलेले फोड फुटून पायातून रक्त वाहत होतं.. पण अन्नदात्याने निर्धार केला होता.तो आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्याचा. शेतकऱ्यांच्या मोर्चातले काही मन हेलावून टाकणारे फोटो व व्हिडीओस  माध्यमात व  सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

                         असाच एक फोटो होता पायाला गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या दिंडोरी च्या सखुबाई आज्जींचा.या मोर्चामध्ये विनाचप्पल चालल्याने सखुबाई या वृद्ध आजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली.व डॉक्टरांनी  आजींना हॉस्पिटलमध्ये उपचार आवश्यक असल्याचं  सांगितलं असतांना देखील जीवाची पर्वा न करता त्या मोर्चासोबतच राहिल्या.आपलं दुखं,दुखापतिकडे दुर्लक्ष करत माझी हक्काची जमीन मला मिळावी आणि माझ्या सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथेच थांबणार असा निर्धार अख्या महाराष्ट्राने पाहिला.म्हणून या दुर्दम्य अशावादास सलाम.

                            शहरी लोकांच्या संवेदना  बोथट होत चाललेल्या अनेकांनी पावलोपावली अनुभवलेल्या घटना रोजच घडत पहात असतांना एबीबी माझाची प्रतिनिधी असलेल्या मनश्री पाठक या तरुण भगिनीने गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या सखुबाई आज्जीच्या रक्ताळलेल्या तळपायाच्या जखमा बघून तिच्या पायांत स्वतःच्या हाताने चप्पल घातली.
                 मनश्री तू माणूस असल्याचे तुझ्या कृतीतून दाखवून दिले आहेस हे दृश्य बघून माणुस असणार्या करोडोंचे काळीज कळवळले.डोळ्यांत पाणी आले........ 

              या पार्श्वभूमीवर मनुश्री तुझ्या ठायी असलेली सहृदयता अख्या राष्ट्राला  दिसली. सलाम तुझ्या ह्या छोट्याश्या मात्र डोंगरा एवढ्या कृतीला.
                         मनश्री तुझ्यातले माणूसपण ह्या घटनेतून पहावयास मिळाले ... तुला सलाम...
श्री.खंडू मोरे,प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा.फांगदर ता देवळा नाशिक.

Thursday, March 8, 2018

अहिराणी लोकगीतातील आई सप्तशृंगी

अहिराणी लोकगीतातील आई सप्तशृंगी 
"सप्तशृंग" म्हणजे सात डोंगरांचा समुदाय, नांदुरीजवळ असणार्या पर्वतरांगेला "सप्तशृंग" असे म्हटले जाते. त्यापैकी एका शिखरावर या देवीचे वास्तव्य आहे. "सप्तशृंग" स्थळी वास्तव करते ती "सप्तशृंगी" साडेतीन पीठांपैकी हे अर्धे पीठ आहे. शेजारी मार्कंडेय पर्वत आहे.  पर्वतावर  मार्कंडेय ऋषींचा आश्रय होता.  आदिशक्तीला  तप करून त्यांनी प्रसन्न करून घेतले होते. 
    ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात १७५५ व्या ओवीत "सप्तशृंगी" देवीचा उल्लेख आढळतो. 
तो मत्सेन्द्र सप्तशृंगी । 
भग्नावया चौरंगी ।
भेटला कि तो स्वर्गाशी ।
संपूर्ण झाला ।
    अशा या अर्धेपीठ असणाऱ्या आदिशक्ती "सप्तशृंगी" देवीचे वर्णन अहिराणी  लोकगीतामध्येही विवेचक, वेधक व निसर्गरम्यतेने रेखाटलेले आढळते. 
याळू सप्तशृंगी वं माय तेलनी ।
खानदेश तून माहेर वं माय तेलनी ।
कोकण तून सासर वं माय तेलनी ।
डोंगरले दीधा येढा वं माय तेलनी ।
सप्तशृंगी देवीचे माहेर हे खान्देशचे असून  जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कोकणा समाजाची वसाहत मोठ्या प्रमाणात राहत असल्याने ह्या भागाला कोकण असे  संबोधले जाते. नांदुरीचा या  भूभागाला पण कोकणच संबोधले जाते. हेच कोकण हे "सप्तशृंगी" देवीचे  सासर आहे."सप्तशृंगी" डोंगराला तू मायावी रूपाने वेढा दिला आहे असा उल्लेख या गीतात आढळतो. देवीची मान किंचीत वाकडी आहे याची कारणमीमांसा  एका गीतात आहे ती अशी 
सप्तरशिंगी माय वाकडी वं तुनि मान । 
खानदेश माहेर तिकडे वं तूनं ध्यान ।
देव मजार देव ही भवानी आभंड ।
दैतना मांघे पाडी डोंगरले खिंड ।
"सप्तशृंग" डोंगरासमोर असणार्या एका डोंगराला दैत्याच्या पाठीमागे धावतांना लाथ मारल्यावर खिंडार पडले आहे जे आजही पुरावा म्हणून आपणास दिसते असा लोकांचा समाज आहे. खान्देशातील माहेराकडे तू बारकाईने ध्यान देतेस म्हणूनच मान वाकडी केली आहे असा उल्लेख यामुळेच या गीतात आलेला आहे. 
सप्तरशिंगी माय गडवरली पिवळी ।
तिना दंडवर अठरा भूजानी काचोळी ।
या देवीला एकून अठरा भुजा आहेत व तिने परिधान केलेली काचोळीसुद्धा अठरा भुजांचीच आहे. एका गीतात हा गड चढायला फार अवघड आहे, असा उल्लेख आढळतो. 
सप्तरशिंग्या गड चढता चढायेना ।
मायना पायखाल उभा दैत गाडायेना ।
हा गड खूप उंच आहे त्यामुळे चढवला जात नाही. नंदुरीपासून पायी जाने पूर्वी फार जिकीरीचे होते आज बस गडावर जाते. त्यामुळे फक्त गडावरच्या पायर्या चढाव्या लागतात. तरीही वृद्ध व स्रियांना फार त्रास होतो. डोंगर,  दर्या,दाट वेळूचे वन, फुले, हजारोंची वानरसेना, कड्याकपारीतून झिरपणारे नितळ पाणी अशा स्वर्गस्थानी आई सप्तशृंगी विसावली आहे. 
तठे काय शोभे स्वर्गस्थान ।
तठे काय शोभेरे देवीनं ठाण।
अशा उंच ठिकाणी हि "सप्तशृंगी" आई स्थानापन्न झाली आहे. तिची नजर चहुबाजूला त्यामुळेच राहू शकते. वाघाचा घोडा व सापाचा चाबूक तिच्याजवळ आहे. जगदंबा "सप्तशृंगी" देवीचा गौरव या अहिराणी गीतांतून अनेक प्रतिमा, प्रतीके, विशेषणे, अलंकार लावून आपल्या पूर्वजांनी केला आहे 
श्री .खंडू मोरे,प्राथमिक शिक्षक फांगदर ता देवळा (नाशिक)