Monday, July 3, 2017

आमची परसबाग

आमची परसबाग
             खडकाळ डोंगराच्या माळरानावरआमच्या फांगदर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही सुंदर परसबाग फुलविली.या बागेत दीडशे झाडांबरोबर शाळेकडून परसबागेत भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे.बागेतील ताज्या भाज्यांचा शालेय पोषण आहारासाठी वापर केला जात असल्याने मुलांना दररोज सकस आहार मिळतअसतो.
                    खामखेडा  (ता. देवळा ) येथील फांगदर जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे अठावीस विद्यार्थी शिक्षण घेत असूनदोन  शिक्षक आहेत. शाळेत नवनवीन उपक्रम राबविले जात असल्याने वस्तीवरील नागरिकाकडून ,पालकाकडून तशेच गावकऱ्यांतून समाधान व्यक्‍त केले जाते. शाळेतील शिक्षक आनंदा पवार यांनी विद्यार्थ्यांना खरीप व रब्बीच्या पिकांची माहिती व्हावीया उद्देशाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्रपाण्याअभावी अडचण येत होती. दरम्यानशाळा परिसरातील भाऊसाहेभ उमाजी देवरे यांनी आपल्या कुपनालीकेवरून पाणी जोडणी करून घ्या अशी शिक्षकांना विनंती केली ह्या दातृत्वाची लगोलग शिक्षकांनी काम मार्गी लावत दोन इंची व्यासाची अठरा पाईप आणून जेसिपीने चारी खोदाई करत पाईपलाईन टाकुन घेतली आता दर दिवसाआड शालेय परिसरातील एक हजार क्षमतेची टाकी भरत झाडानाही पाणी दिले जात आहे   


















शालेय आवारातील परसबाग


                        त्यानंतर शिक्षक आनंदा पवार व खंडू मोरे यांनी तिसरीचौथीतील वर्गातील विद्यार्थ्यांना कामाला सुरवात केली. इयत्ता चौथीतील दिपक गांगुर्डे ,खुशाल सोनवणे ,समृद्धी पवार,दिग्यासा सूर्यवंशी ,पुजा बच्छाव रिंकी गांगुर्डे,अशा सोनवणे ,वैशाली सोनवणे ,हर्षद वाघ या विद्यार्थ्यांनीचार पाच वाफे तयार करत मेथीकोथिंबीरपालक या पालेभाज्यांसह मिरचीटोमॅटेवांग्याची लागवड केली. विद्यार्थ्यांनीच निंदणीखुडणीची कामे करून ही परसबाग फुलविली. दरम्यानखरीप पिकांबाबत माहिती मिळण्यासाठी जूनमध्ये आंबाडीज्वारीमूगभुईमूगउडीद ही खरिपाची पिके घेण्यात आली होती. 
 पालेभाज्यांचा पोषण आहारासाठी वापर 
परसबागेतील ताज्या पालेभाज्यांचा वापर शालेय पोषण आहारासाठी केला जात आहे. मुलांना सकस आहार मिळत असल्याने पालकांतूनही समाधान व्यक्‍त होत आहे. तशेच शालेय परिसारत गिलके,दोडके,तशेच अडुळसा ,कोरपड,रानतुळस,कर्दळ,लाजाळू ,डीडोनिया अशे औषधी वनस्पती देखील लावल्या आहेत















देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी म्याडम परसबागेस भेट देताना
शिक्षक काय म्हणतात... 
आनंदा पवार , शिक्षक : विद्यार्थ्यांना खरीप व रब्बीच्या पिकांची माहिती व्हावीया उद्देशाने आतापर्यंत नोकरी केलेल्या प्रत्येक शाळेत परसबाग फुलविली आहे. यापूर्वी तुंगण,राजापुर  येथील शाळेत हा उपक्रम राबविला. त्या ठिाकणी आजही विद्यार्थ्यांनी हा पायंडा कायम ठेवला आहे.

खंडू मोरे शिक्षक : विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. गावातच राहत असल्याने शाळेला सुट्टी तशेच शालेय वेळेनंतरही  बराच वेळ परसबागेत असतो. यासाठी पालकांसह गावातील भजनी मंडळ , शालेय विध्यार्थी , शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बच्छाव,भाऊसाहेब देवरे
,भास्कर वाघ,बापू वाघ ,सुरेश वाघ.खंडू पवार व पालकवर्ग यांची मोठी मदत मिळाली.
  गटशिक्षण अधिकाऱ्यांची परसबागेस भेट
देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी म्याडम यांनी भेट देत ह्या उपक्रमाची स्तुती केली ह्या उपक्रमांमुळे विध्यार्थ्यांना शाळेची गोडी लागतेच त्या बरोबर भाजीपाला वर्गीय पिकांची ओळख होत असल्याचे सांगितले.ह्याच बरोबर शाळेस भेट देणाऱ्या सर्वच मान्यवर शाळेने तयार केलेल्या बागेला भेट देत असतात.

No comments:

Post a Comment