आदर्श शाळा फांगदर ता देवळा
जिल्हा नाशिक
नाशिक
जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या शेवटच्या गावातील फांगदर ह्या आदिवासी वस्तीवर वस्तीशाळा
म्हणुन ही शाळा पंधरा वर्ष्यापुर्वी २ जुलै २००१ रोजी ह्या वस्तीवर सुरु झाली.शेतमजुरांच्या
आदिवासी वस्तीवर अपुऱ्या भौतिक सुविधांच्या सहाय्याने सुरु असलेल्या अश्या आदिवासी
शाळेतच लोकसहभागातून खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांच्या तोडीस तोड देणारा दर्जा
आनंदा पवार व खंडु मोरे या शिक्षकांमुळे ह्या शाळेला मिळाला आहे.उपक्रम शिलतेच्या
जोरावर राज्यातील कानाकोपऱ्यात ह्या शाळेचे नाव जाऊन पोहचले आहे.धरूया शिक्षणाची
कास करुया वस्तीचा विकास ह्या ब्रिद वाक्य्यानुसार शाळेमुळे वस्तीचा विकास घडू
लागला आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक
शाळांमधील चौथी व महाराष्ट्रातील पहिली आयएसओ मानांकन मिळवणांरी वस्तीशाळा ठरली
आहे.शाळेत गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात.शाळेच्या विकासात खामखेडा
ग्रामस्थ,विविध सामाजिक संस्था,समाजातील दानशुरांच्या सहाय्याने व आनंदा पवार व
उपशिक्षक खंडू मोरे व पालकांच्या अथक परिश्रमातून राज्यभरातील समस्थ प्राथमिक
शाळांना उर्जादाई असे कामकाज देवळा तालुक्यातील आदिवासी वस्तीवरील शाळेने
महाराष्ट्रा समोर उभे केले आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शाळेने प्रगत शाळा
म्हणुन लौकिक मिळवला आहे.गुणवत्ता विकासात शाळेने माघील पाच वर्ष्यापासून सतत अ
श्रेणीत स्थान पटकावले आहे.
गिरणा नदीच्या काठावर कळवण,देवळा व सटाणा तालुक्याच्या हद्दीवर बसलेलं खामखेडा हे गाव देवळा तालुक्यातील ह्या गावाच्या उत्तरेला असलेल्या फांगदर ह्या आदिवासी बहुल वस्तीवर २ जुलै २००१
रोजी धरूया शिक्षणाची कास करुया वस्तीचा विकास ह्या
शासनाच्या उदात्त धोरणातून वस्तीशाळा सुरु झाली.
खामखेडा गावापासुन ४ किमी अंतरावर असणारे फांगदर हि पंचविस ते तिस घरांची आदिवासी शेतमजुरी
करणाऱ्या लोकांची लोकवस्ती.ह्या वस्तीवर शाळा सुरु झाली.२००७ सालापर्यंत या शाळेची इमारत म्हणजे खाजगी कौलारू घर,कांदाचाळ,पत्र्यांचा शेड,खाजगी पत्र्यांची खोली,पाचटाचा झाप भौतिक सुविधांचा अभाव असलेली,अपुरी बैठक
व्यवस्था असलेली शाळा अशी
होती.
मात्र २००७ मध्ये हि शाळा जिल्हा परिषदेकडे नियमित झाल्यावर सर्व शिक्षा अभियानातून शाळेला टुमदार इमारत मिळाली.टेकडीवर बांधकाम
केलेली ही शाळा आज दोघां शिक्षकांनी शाळा स्तरावर
राबवलेल्या ज्ञानरचनावाद,क्षेत्रभेट उपक्रम,डिजीटल इंटर अक्टीव क्लासरूम,औषधी बगीचा,सुंदर शैक्षणिक संकुल,विविध शैक्षणिक साहित्यातून
अध्यापनाची गोडी,समारंभ,विविध जयंती
उत्सव,सामाजिक संस्था,देणगीदारांच्या योगदानातून विकास करत
शाळा स्तरावरील विविध शैक्षणिक उपक्रम
राबवल्याने फांगदर शाळेची ही
एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
उपक्रमशील शाळा
सतत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांमुळे जिल्ह्यातील सर्वाधिक ‘उपक्रमशील शाळा’ असा नावलौकिक या शाळेने मिळवला आहे. पाच वर्षांपूर्वी गुणवत्ता विकासात शाळा ‘ड’ श्रेणीत होती.परंतु अवघ्या दोन वर्षांत शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि लोकसहभाग यामुळे फांगदर शाळेने अंतर्बाह्य़ बदल घडवून आणत थेट आयएसओ मानांकनालाच गवसणी घातली आहे. मुळात ही शाळा द्विशिक्षकी. परंतु शाळेचा हा कायापालट करण्यास शिक्षक खंडू मोरे आणि आनंदा पवार यांचे अपार प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

लोकसहभागातून शाळेचा विकास
शाळेच्या प्रगतीत लोकसहभाग
महत्त्वपूर्ण ठरला आहे.शाळेत येणारा सर्व विध्यार्थ्यी
वर्ग हा शेतमजुर आदिवासी बांधवांचा असतांना देखील शिक्षकांनी आज पावेतो
शाळास्तरावर जवळजवळ आठ लक्षाहून अधिक लोक सहभाग जमा करत शाळा विकासासाचे उपक्रम राबवलेले आहेत.कोणत्याही शासकीय मदतीविना शाळेने लोकसहभागातून
एका वर्गात ‘ई
लर्निग’च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापनाची सोय केली आहे.संगणक,प्रोजेक्टर,साउंड
सिस्टीम, इंटर अक्टीव स्मार्ट बोर्ड,इम्प्लीफायर,यांसह
आदर्शवत ईलर्निंग सुविधा ,देवळा डॉक्टर असोशियश,स्वप्निल अग्रो वडाळा,बिल्डर्स
असोशियान मालेगाव चे अध्यक्ष रमेश शिरसाठ,सुनिल पाटील,नानाजी मोरे,सी आर
पाटील,संजय बच्छाव ह्या दात्यांच्या मदतीने शाळेला मिळाली आहेत. या योगदानामुळे आदिवासी
विध्यार्थीनां आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देत आहोत.शाळेचे क्रीडांगणही लोकसहभागातूनच तयार झाले
आहे. उमाजी देवरे, भाऊसाहेब
देवरे, प्रभाकर शेवाळे या गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून
चारशे फुटावरून शाळेसाठी स्वत:च्या विहिरीवरून जलवाहिनी उपलब्ध करून दिली आहे. तर
संजय बच्छाव यांनी शालेय आवारात शालेय कमान तयार करून दिली.
शाळा रंगरंगोटी, ,औषधी बगीचा,सुंदर शैक्षणिक संकुल,साहित्य निर्मिती,पाण्याची व्यवस्था,हातपंप,शालेय आवारात पाच लक्ष
खर्च करत फेवर ब्लॉक, भौतिक सुविधांची पुर्तता करत हे तशेच अनेक काम शिक्षकांनी शाळा स्तरावर केली आहेत.
भिंती-फरशी झाल्या बोलक्या
विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी दररोज एक प्रश्न विचारला जातो.प्रयोगशील शिक्षणाच्या बाबतीत इतर शाळांपेक्षा फांगदर एक पाऊल पुढे आहे. शाळेतील दोन्ही वर्गात जमिनीवर मुळाक्षरे, गणिताचे ज्ञानरचना वादी तक्ते रंगविण्यात आले आहेत.बेरीज पाट्या ,वजाबाकी पाट्या ,स्थानिक संख्या ओळख,यांसह इतर अनेक शैक्षणिक घातक शिकविण्यासाठी तळ फळे तयार करत विध्यार्थी प्रत्यक्ष कृतीतुन अशाच पद्धतीने शिकत आहेत. शाळेत मुलांच्या क्षमतांनुसार तीन गट तयार करून त्यांच्या गरजेनुसार तयारी करून घेतली जाते. वाचन प्रेरणा दिन इतर शाळांमध्ये वर्गात चार भिंतींआड साजरा झाला. फांगदर शाळेने मात्र तो निसर्गाच्या सान्निध्यात टेकडीवर जाऊन प्रत्यक विद्यार्थ्यांस एकेक धडा वाचावयास सांगून साजरा करण्यात आला.

हिरवाईने नटलेली शाळा
शालेय आवारातील वृक्षसंपदा व शाळेचे मनोहारी रूप भुरळ घालते. टेकडीच्या माथ्यावर टुमदार अशी शाळेची इमारत आकर्षक रंगरंगोटीने लक्ष वेधून घेते.आज तालुक्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून फांगदर शाळेकडे पाहिले जाते. पिण्यास देखील पाणी मिळणे मुश्कील असलेल्या ठिकाणी खडकाळ माळरानावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा हिरवाईने नटवली आहे.

शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक
झाडे आहेत.त्यात बेचाळीस औषधी वनस्पतींचा बगीचा शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने
तयार केला आहे.हिरडा
,बेहडा,जायफळ,कोरपड,आनंद,जयपाल,आवळा,तुळस,रिठा,निंब,वड,अश्वगंधा,यासह जिल्ह्यातील
प्राथमिक शाळांमधील पहिली औषधी बगिचा असलेली शाळा शिक्षकांनी प्रतिकुल परिस्थितीत
निर्माण केली आहे. शालेय आवारातील प्रत्येक वृक्षास शिक्षकांनी नावे दिली आहेत.त्यामुळे विध्यार्थ्यांना वृक्षांची ओळख
होत असते.शाळेत वॉटर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय
करण्यात आली आहे. या शिवाय कार्यालयात कार्पेट, प्रत्येक वर्गातील खिडक्यांना पडदे, विद्यार्थी-शिक्षकांना ओळखपत्र
यामुळे ही आपले वेगळेपण सिद्ध करत नावारुपास आली आहे.
शालेय आवारात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या
मदतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी झाडांवर बाटल्यांच्या साहाय्याने सुविधा
केली आहे. त्यामुळे चिमणी, साळुंखी,
कावळे यांसह विविध पक्ष्यांचा किलबिलाट शालेय आवारात ऐकू येतो.
तालुक्यातील पहिली डिजिटल ईलर्निंग शाळा
तालुक्यातील पाहिली डिजिटल ईलर्निंग शाळा म्हणून फांगदर शाळेचा लौकिक आहे. संगणक, इंटरअॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टरवर शाळेत अध्यापन केले जाते.आदिवासी शेतमजुरांची मुल अध्यापन करत असतांना ह्या साधनांचा कुशलतेने वापर करतात.ई लìनग सुविधा शाळेत आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी टॅबलेटच्या साहाय्याने शिक्षण घेत असल्याचे परिसरात मोठे अप्रूप आहे.तंत्रस्नेही साधनांचा प्रभावी वापर करत शाळेतील चौथीतील मुले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्वतः तयार करतात.शाळेतील पहिली पासुन विध्यार्थी संगणक हाताळत असल्याचे विधायक चित्र ह्या शाळेवर पहावयास मिळते.शिक्षकांनी विविध शैक्षणिक व्हीडीओस तयार केले असुन शाळेचा स्वतंत्र ब्लॉग आहे. ह्या साधनांचा अध्यापनात वापर होत असल्याने विध्यार्थी उपस्थिती व गुणवत्ता वाढ झाली आहे.

क्षेत्रभेटीला महत्त्व
अध्ययन व अध्यापन प्रक्रिया विविध उपक्रमांच्या माध्यमांद्वारे फांगदर शाळेत रंजक बनविण्यात आली आहे.पारंपरिक ‘खडू फळा’ या पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न सुरू असून क्षेत्रभेट उपक्रमामागे चार भिंतींच्या आड मिळालेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे हा उद्देश आहे. घोकंपट्टी पद्धतीच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त केले जात आहे.कधी टेकडीवर, कधी उघडय़ा मैदानावर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्देशाने नेऊन विद्यार्थी व शिक्षकांमधील अनामिक भीती दूर कशी होईल, ते पाहिले जात आहे.

नदी, घाट,
लघु उद्योग, बायोगॅस प्रकल्प, आदर्श आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी,
कुक्कुटपालन उद्योग, साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत.
क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमात असलेल्या अनेक गोष्टी समजून घेण्यास मदत होते. या
शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीतही भर पडते.
विध्यार्थ्यांना चाकोरी भायेर पडत अध्यापन करतांना सुलभता व सहजता अनुभवास
येत असल्याने सहज शिक्षण यातुन निर्माण होत असते.शिक्षकांच्या धडपडीमुळे व
ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा इथपर्यंतचा विकास घडून आला आहे.ही शाळा म्हणजे
शिक्षण विभागासाठी भूषण असल्याची जिल्हा परिषदेचे शिक्षण व लोकप्रतिनिधींच्या शाळा
भेटी दरम्यानच्या प्रतिक्रिया शाळेविषयी सर्व काही सांगून जाते.
अक्षरांची रांगोळी
‘अक्षरधारा’ या उपक्रमांतर्गत गारगोटीच्या दगडांपासून, शंख-िशपल्यांपासून विद्यार्थी अक्षरांची रांगोळी रेखाटतात. या शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, उकार यांची जोड देत नवीन शब्द तयार करण्यास शिकविले जाते. त्यांच्या नेहमीच्या खेळातल्या या वस्तू वापरून जोडशब्द शिकविण्याची ही न्यारी पद्धत विद्यार्थ्यांना भावते. प्रत्यक्ष कृतीतून शब्द तयार करण्याची अक्षरधारा पद्धत विद्यार्थ्यांवर लहान वयातच भाषेचे उत्तम संस्कार करते.

दप्तरमुक्त
शनिवार
शालेय वेळेत
विद्ध्यार्थी अनेक शैक्षणिक उद्धीष्ट पूर्ण करत असतात.त्यामुळे सर्वांगीण विकासाचे
अनेक बाबी ह्या नियोजनात असतांना देखील माघे पडतात.त्यामुळे शैक्षणिक घटक पूर्ण
करण्यासाठी नेहमी शिक्षकांनां कसरत करावी लागत असते.विध्यार्थी सर्वांगीण
विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच कवायत,व्यायाम,योगासने,प्राणायाम,ईलर्निंग
साहित्याचा अधिक वापर,ज्ञानरचना वादी साहित्य ,विविध साहित्य खेळ ह्या बाबी माघे
राहतात.ह्या सर्व बाबी आम्ही दर शनिवारी प्रभावीपणे राबवत असतो.ह्या दिवशी
मुलांच्या दप्तराला सुट्टी असते.मागील शैक्षणिक वर्ष्यात दप्तर मुक्त शनिवारी सर्व
उपक्रम प्रभावीपणे राबवत असल्याने शनिवारची उपस्थिती शंभर टक्के टिकवुन ठेवण्यात यश
आले आहे.
प्राणी-पक्षी-फुले आम्ही शाळेची वर्गात हजेरी
लावण्याची
पद्धतीही मजेशीर आहे. हजेरीच्या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नाव पुकारल्यानंतर ‘यस सर’ म्हणण्याऐवजी विद्यार्थी फळांची, फुलांची, प्राण्यांची, पदार्थाची मराठी अथवा इंग्रजी नावे घेतात.त्यामुळे दररोजची हजेरी कंटाळवाणी होत नाहीच; शिवाय विद्यार्थी वेगवेगळ्या फुलांची, फळांची, प्राण्यांची नावे शिकून येत असल्याने त्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासही मदत होते. साधा हजेरीचा कार्यक्रमही शाळेने ज्ञानरचनावादी केला आहे.

सोशियल मीडियाचा वापर
जिल्ह्यातील पाहिला
शाळेचा http://khandumore34dreamsschool.blogspot.in/ब्लॉग असणारी पहिली
शाळा फांगदर आहे.त्याच बरोबर शिक्षकांनी स्वतःचा ब्लॉग तशेच khandumore
शैक्षणिक युट्युब चानल तयार केले असुन अनेक शैक्षणिक साहित्य ह्या ठिकाणी
पहावयास मिळते.शाळेचा नावाचे zpschoolfhangdar या नावाने फेसबुक पेज केले असल्याने
शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम नेहमी शिक्षक सोशियल माध्यमातुन झळकवत असल्याने
शाळेचे विविध उपक्रम राज्यभर राबवले जात आहेत.व सामाजिक संस्थाकडून ह्या शाळेला
विविध शैक्षणिक साहित्य शैक्षणिक उठाव देखील मिळत आहे.
शालेय वस्तु भांडार
शाळेत
येणाऱ्या विध्यार्थींची परिस्थिती हलाकीची आहे.त्यामुळे व वस्तीवर शालेय गरजा
पूर्ण होतील अशी व्यवस्था नसल्याने आम्ही शिक्षकांनी शाळेत वस्तु भांडार तयार केले
आहे.ह्या वस्तु भांडारात विध्यार्थ्यांना पेन,पेन्सिल,वह्या,रंग,तशेच शालेय
शैक्षणिक साहित्य नां नफा नां तोटा या तत्वावर मिळते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या
गरजा शाळेतच पूर्ण होतात.याचा हिशोब शाळेतील विध्यार्थी ठेवत असल्याने
विध्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान शाळेतच मिळत असल्याने विध्यार्थ्यांचे हे वस्तु
भांडार कौतुकाचा विषय ठरले आहे.
शाळा भेटी
माघील वर्ष भरात अनेक शाळातील शिक्षक अधिकारी,पदाधिकारी,पाच हजार हुन अधिक ग्रामस्थांनी शाळेस भेट देऊन शाळेने विध्याथीं
गुणवत्ता व उपस्थिती वाढीसाठी राबवलेले उपक्रम समजून घेत आहेत.ह्या वर्षी चांदवड
देवळा मतदार संघाचे आ डॉ राहुल आहेर यांनी स्वतः भेट देत शाळेचे विविध उपक्रम
जाणुन घेतले.ही बाबशाळा,वस्ती व गावासाठी अभिमानाची बाब आहे.
शालेय शैक्षणीक उपक्रमांसोबत शाळेने सामाजिक बांधिलकीही जोपासली
आहे.समाजाशी संपर्क ठेवत शाळेने माघील वर्षभरात शाळा विकासासाठी वस्तु तशेच निधीच्या स्वरुपात आठ लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव
केला असुन “शाळेला गावाचा
आधार असावा,व गावाला शाळेचा अभिमान वाटावा’’अश्या प्रकारे येथील पालक,ग्रामस्थ ,सामाजिक संस्था ,लोकप्रतिनिधी
व मुख्या आनंदा पवार व खंडू मोरे या शिक्षकांच्या अथक
प्रयत्नातुन,सुंदर समन्वयातून शाळेचा विकास घडून येत आहे.
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर कार्य तडीस गेल्याचा समाधानाचा
आनंद हा परमोच्य आनंद ठरतो.तसाच शाळा विकासासाठी व ते कार्य फलद्रूप होतांना पहातांनाचा आनंद हा अवर्णीय
असाच आहे.
एका आदिवासी वस्तीवरील कुणाच्याही खिजगणितात नसलेल्या आमच्या शाळेला ह्या
आर्थिक वर्ष्यात शाळा विकासासाठी
भरीव निधी आमच्याशाळेला मिळत आहे.ही आमच्या कामाचीच पावती आहे.
आमच्या ह्या शाळेसाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी मा
खा हरिचंद्र चव्हाण,आ डॉ राहुल आहेर,मा धनश्री आहेर(जि.प.सदस्या लोह्ननेर ),नुतन आहेर ( जि.प.सदस्या वाखारी ),केशरबाई आहिरे (सभापती पंचायत समिती देवळा),कल्पनाताई देशमुख (पंचायत
समिती सदस्या लोह्ननेर) यांचे मोलाचे
सहकार्य तशेच मा दिपकुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ,प्राथमिक शिक्षणाधिकारी मा राजीव म्हसकर ,मा श्रीम पुष्पावती पाटील शिक्षण उपायुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक विभाग ,मा.श्री.महेश
पाटील (गटविकास अधि देवळा),मा श्रीम.शोभा पारधी(गटशिक्षण अधिकारी पं.स.देवळा),मा सतिश बच्छाव ,नंदू देवरे(शिक्षणविस्तार अधिकारी पं.स.देवळा),मा शिरीष पवार(केंद्रप्रमुख
खामखेडा)व तालुक्यातील केंद्र्प्रमुख,जिल्हा तशेच राज्य
भरातील प्रेरक प्रेरणा स्रोतांचे ,शिक्षकांचे मार्गदर्शन
मिळत असुन शाळेला आत्तापर्यंत
मिळालेले सर्व यश पालक,ग्रामस्थ ,अधिकारी
,शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाने व सहकार्याने प्राप्त झाले आहे.
अशीच आमची शाळेची उत्तोरत्तर
प्रगती होत जावो या व विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याबरोबर सक्षम,सुजान नागरिक निर्माण होऊन एक सशक्त,समृद्ध,भारत निर्माण आमच्या हातुन घडोत ह्या साठी आपल्या अशिर्वाद चिंतितो.