Tuesday, July 2, 2019

फांगदर ता देवळ्याची जिल्हा परिषद शाळा भरणार रोव्हर चिप द्वारे थेट मंगळावर

https://khandumore34dreamsschool.blogspot.com/2019/07/blog-post.html
फांगदर ता देवळ्याची जिल्हा परिषद शाळा भरणार रोव्हर चिप द्वारे थेट मंगळावर
खंडु मोरे,फांगदर 
विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या जिल्हा परिषदेच्या फांगदर ता देवळयाच्या शाळेतील विध्यार्थ्यांना थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे यांनी नुकतीच त्यासाठीचे शाळा,शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी केली होती.त्याचे नुकतेच बोर्डिंग पास देखील आले आहेत…!!
मथळा आणि वरचा परिच्छेद वाचुन बुचकुळ्यात पडलात ना तर ‘नासा’ या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर 2020’हे अंतरिक्षयानमंगळावर झेपावणार आहे.या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.ह्या ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत.
             त्याअंतर्गत फांगदरच्या शाळेच्या  मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमसाठी नोंदवले होते.त्याची ऑनलाईन आलेले बोर्डिंग पास नुकतेच मिळाले असुन बोर्डिंग पासचे वाटप शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन मोरे,दिपक मोरे,सागर पवार,सोनजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
            नासाच्या पसाडेना ,कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (75 नॅनोमिटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत.इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील.ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी,तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी नावे मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे संजय गुंजाळ यांनी सांगितले. 

         रोव्हर 2020 हे यान ‘ऍटलस V 541 या रॉकेट च्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे.जे 2021च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.

         या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था ,मंगळ ग्रह त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर 2020 हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.
सुनिता धनगर गटशिक्षण अधिकारी देवळा.
दैनिक लोकमंथनणे घेतलेली आमच्या उपक्रमाची दखल.

दैनिक महाराष्ट्र टाईम्सने घेतलेली आमच्या उपक्रमाची दैनिकाच्या पहिल्या पानावरील दखल.

दैनिक देशदूतने घेतलेली आमच्या उपक्रमाची दैनिकाच्या जिल्हा  पानावरील दखल.

दैनिक पुढारीने घेतलेली आमच्या उपक्रमाची दैनिकाच्या जिल्हा  पानावरील दखल.


2 comments:

  1. Very nice dream innovation fangdar z p school...

    ReplyDelete
  2. https://www.saamana.com/school-of-fagandar-on-mars-online-registration/
    फांगदर शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट ‘मंगळा’वर; विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी
    सामना प्रतिनिधी । देवळा

    ReplyDelete