Wednesday, February 6, 2019

खडकाळ माळरानावरील नंदनवन वाचवण्यासाठी सोशियल माध्यमातुन मदत

खामखेडा ता देवळा येथील फांगदर येथील प्राथमिक शाळेने अतिशय बिकट परिस्थितीत उजाड माळरानावर विध्यार्थी,शिक्षक व पालक ग्रामस्थांच्या मदतीने शालेय आवारात तीनशेहून अधिक झाडे जगवलित ह्या झाडांसाठी शालेय आवारात केलेले बोरवेलचे आटल्याने पाण्याचा थेंब तसेच विध्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी  देखील मिळणे दुरापास्त होते.हि गंभीर अडचण सोडवण्यासाठी शाळेला सोशियल माध्यमातुन आर्थिक मदत मिळत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकला.






                 विध्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी व अतिशय प्रतिकुल परिस्थितीत वाढवलेली वनराई दुष्काळात मात्र पाणीच आटल्याने जगवायची कशी हा यक्षप्रश्न शिक्षकांपुढे होता.शाळेजवळील शेतकरी संजय धर्मा बच्छाव व भाऊसाहेब उमाजी देवरे यांनी आपल्या विहिरी वरून पाणी घेऊन जा असा शब्द दिला.मात्र आर्थिक परिस्थिती अभावी ६०० फुटावरून पाणी आणण्यासाठी तिन इंची पाईपलाईन व खडकाळ जागेवरून खोदाईसाठी (जेसिपीज)ने शाळेला विस हजाराहून अधिक खर्च येण्याची शक्यता व पैशांची आवश्यकता होती.
        ह्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावायासाठी शाळेचे शिक्षक खंडू मोरे यांनी सोशियल माध्यमात आवाहन केले होते.ह्या आवाहनास मुळचे नाशिक व नोकरीनिमित्त परदेशात असणारे दोहा,कतार येथील रविंद्र नारायण आहेर यांनी १५ हजार व अंगोला देशात मॅकेनिकल इंजिनियर असलेले दिपक भामरे यांनी ५ हजाराची आर्थिक मदत,शिक्षक संजय धोंडगे अकराशे रुपयांची मदत तशेच खामखेडा वन विभागाचे वनरक्षक शांताराम आहेर यांनी सहा तास जेसीपी उपलब्ध करून देत शाळेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला.
    आदिवासी वस्तीवरील प्राथमिक शाळेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी परदेशात असुन देखील ग्रामीण भागातील शाळेला मदत केल्याबद्दल मुख्याध्यापक संजय गुंजाळ व शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी देणगीदारांचे आभार मानले.






बागेत झाडांना पाणी भरताना मुले 






          आपले काम अश्वासक असेल तर आपणास कुटूनहि मदत मिळू शकते.फांगदर शाळा व शिक्षकांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शाळेचा विकास घडवुन आणला.म्हणुन सोशियल माध्यमातुन परदेशातून मिळालेली मदत शिक्षण विभागाच्या दृष्टीने भुषणावह आहे.
सुनिता धनगर,गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती देवळा.
वृत्त पत्रांनी घेतलेली दखल.


खडकाळ माळरानावरील नंदनवन वाचविण्यासाठी सोशल ‘फंडा’ यशस्वी - https://www.deshdoot.com/nashik-news-fangdar-digital-school-khamkheda-deola-breaking-news/




खडकाळ माळरानावरील नंदनवन वाचविण्यासाठी सोशल ‘फंडा’ यशस्वी - https://www.deshdoot.com/nashik-news-fangdar-digital-school-khamkheda-deola-breaking-news/

No comments:

Post a Comment