सलाम दिंडोरीतल्या सखुबाई
व मुंबईतल्या मनश्री पाठक या दोघींना.
सूर्य आग ओकत
होता... चालून चालून पाय सुजले होत... पायाला आलेले फोड फुटून पायातून रक्त वाहत
होतं.. पण अन्नदात्याने निर्धार केला होता.तो आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करुन
घेण्याचा. शेतकऱ्यांच्या मोर्चातले काही मन हेलावून टाकणारे फोटो व व्हिडीओस माध्यमात
व सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
असाच एक फोटो होता पायाला गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या दिंडोरी च्या सखुबाई आज्जींचा.या मोर्चामध्ये विनाचप्पल चालल्याने सखुबाई या वृद्ध आजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली.व डॉक्टरांनी आजींना हॉस्पिटलमध्ये उपचार आवश्यक असल्याचं सांगितलं असतांना देखील जीवाची पर्वा न करता त्या मोर्चासोबतच राहिल्या.आपलं दुखं,दुखापतिकडे दुर्लक्ष करत माझी हक्काची जमीन मला मिळावी आणि माझ्या सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथेच थांबणार असा निर्धार अख्या महाराष्ट्राने पाहिला.म्हणून या दुर्दम्य अशावादास सलाम.

शहरी लोकांच्या
संवेदना बोथट
होत चाललेल्या अनेकांनी पावलोपावली अनुभवलेल्या घटना रोजच घडत पहात असतांना एबीबी माझाची
प्रतिनिधी असलेल्या मनश्री पाठक या तरुण भगिनीने गंभीर
जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या सखुबाई आज्जीच्या
रक्ताळलेल्या तळपायाच्या जखमा बघून तिच्या पायांत स्वतःच्या हाताने चप्पल घातली.
मनश्री तू माणूस असल्याचे
तुझ्या कृतीतून दाखवून दिले आहेस हे दृश्य बघून माणुस असणार्या करोडोंचे काळीज
कळवळले.डोळ्यांत पाणी
आले........
या पार्श्वभूमीवर मनुश्री तुझ्या
ठायी असलेली सहृदयता अख्या राष्ट्राला दिसली. सलाम तुझ्या ह्या छोट्याश्या मात्र
डोंगरा एवढ्या कृतीला.
मनश्री तुझ्यातले
माणूसपण ह्या घटनेतून पहावयास मिळाले ... तुला सलाम...
श्री.खंडू मोरे,प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा.फांगदर ता देवळा नाशिक.