*शैक्षणिक वर्षारंभ व प्रवेशोत्सव -२०१९-२०२०*
*शैक्षणिक वर्षारंभ व प्रवेशोत्सव -२०१९-२०२०*
*जि.प.प्राथमिक शाळा फांगदर ता. देवळा जि. नाशिक*
आज सोमवार दि.१७
जुन रोजी जिल्हा परिषद शाळा शाळा फांगदर
ता.देवळा येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा
प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यत आला.शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराना
नविन शैक्षणिक वर्ष्याचा पाहिला दिवस
असल्याने प्रत्येक वर्गासमोर
रांगोळी तसेच आंब्या व झेंडूच्या पानाफुलांचे तोरणे लाऊन शाळा सजवण्यात आली.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गुंजाळ सर यांनी केले.
पहिलीत नवीन
प्रवेश घेणार्या नवोगतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
नवागत प्रवेशित
विद्यार्थ्यांची इकोस्पोर्ट चारचाकी गाडीतून मिरवणूक व प्रभातफेरी काढण्यात
आली.मिरवणुकीत लेकरांच्या चेहऱ्यावरील कोवळं व नाजूक हास्य पाहून आनंद द्विगुणीत झाला.
प्रथमता शाळेच्या वतीने पहिलीत दाखल
झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद मोरे,उपाध्यक्ष सागर पवार, प्रकाश शेवाळे, दिपक मोरे,दत्तु पवार, हेमंत मोरे,प्रभाकर
बच्छाव,राजेंद्र पवार,राकेश बच्छाव,बाळासाहेब
आहेर,रविंद्र शेवाळे,हरी माळी,चिंतामण सोनवणे,सुनिल
सोनवणे,अर्जुन सोनवणे,मुख्याध्यापक संजय गुंजाळ,उपशिक्षक खंडु
मोरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
सर्व
विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरित करण्यात
आले.शाळा स्तरावर प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अनुधावण
करण्यासाठी उपस्थित पशुधन विस्तार अधिकारी एस जी अलई यांनी शाळा स्तरावरील
उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थ वं शाळेचे कौतुक केले.शेवटी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन
आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी फांगदर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शालेय पोषण आहार
वाटप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न म्हणून मोतीचुर लाडूंचे वाटप करण्यात
आले.खंडु मोरे सर यांनी आभार मानले.