Friday, March 15, 2019

DREAMS SCHOOL फांगदर ता देवळा(नाशिक): #अजान

DREAMS SCHOOL फांगदर ता देवळा(नाशिक): #अजान: # अजान आपल्या गावात, शहरात जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे अश्या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी म्हणजेच अल्लाह भक्ति करण्यासाठी मस्जिद असते आणि ह्...

#अजान

#अजान
आपल्या गावात, शहरात जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे अश्या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी म्हणजेच अल्लाह भक्ति करण्यासाठी मस्जिद असते आणि ह्या मस्जिद मधून लाउडस्पीकर वर दिवसातून 5 वेळेस जोरात उंच आवाजात अरबी भाषेत काही वचन म्हटल्याचे आपल्या कानी पडतच असेल तर त्या वचनाला किंवा श्लोकाला अजान ऎसे म्हटले जाते.
मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधला तर त्याचाहि आवाज अल्लाह किंवा परमेश्वराच्या काना पर्यंत पोहोचतो तर हा माणूस इतक्या जोर जोरात अल्लाह किंवा परमेश्वरा ला का पुकारतो आहे ऐसा बहुतेक जणांचा समज आहे, मात्र मस्जिद मधून पाच वेळेस जी अजान पुकारली जाते त्याचा उद्देश परमेश्वराची किंवा अल्लाह प्रार्थना नाही तर श्रद्धावान भाविकांना नमाज साठी आमंत्रण असते आवाहन असते.
फार पूर्वी घड्याळीचा शोध लागलेला नव्हता आणि दिवसातून पाच वेळ नमाज ची निश्चित वेळ ठरलेली असते मात्र वेळ समजत नसल्याने नमाज ची वेळ चुकु नये म्हणून एक व्यक्ति दिवसातून 5 वेळेस ठरलेल्या वेळी अजान देत असते अजान देणाऱ्या व्यक्तीला मुअज्जिन ऎसे म्हणतात.
अजान देणारी व्यक्ति वुजू { तोंड हाथ पाय स्वच्छा धुनें }करून काबा कड़े {पश्चिमे कड़े }तोंड करून उंच जागेवर उभे राहून कानात बोट टाकून जोरात आणि खड्या आवाजात अजान पुकारतो आणि भाविकांना नमाज ला येण्यासाठी आवाहन करत असतो.
ती अज़ान आणि तिचा मराठी अनुवाद माझ्या बौद्धिक कुवती प्रमाणे देत आहे.
अल्लाह हु अकबर 2
अल्लाह हु अकबर 2
अशाहदुअल्लायलाहा इलेलाह 2
अशादुआंना मुहमदुर रसुलल्लहा 2
हैय्या ल सलाह 2
हैय्या लल फलाह 2
अल्लाह हु अकबर 2
अल्लाह हु अकबर
ला ई ला हां इलेल्लाह
अशी अजान असते
आता आपण अजान चा मराठी अनुवाद बघुया तो समजने महत्वाचे आहे.
पहिल्यांदा अजान देणारा
अल्लाहु अकबर ऎसे चार वेळेस म्हणतो त्याचा अर्थ ऐसा होतो की
अल्लाह म्हणजे परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे.
पुढे तो म्हणतो
अशादुअल लाईलाह इलेलेलाह
याचा अर्थ
अल्लाह म्हणजेच परमेश्वरा शिवाय कोणीही उपासने योग्य नाही याची मी ग्वाही देतो.
अशादुअन्ना मुहमदर रसूल अल्लाह
याचा अर्थ
होय मुहम्मद पैगंबर हे अल्लाह चे परमेश्वराचे प्रेषित आहेत मी याचीही ग्वाही देतो.
पुढची ओळ आहे
हईय्या लल सलाह
याचा अर्थ होतो
नमाज साठी या.
पुढची ओळ आहे
हाई या लल फलाह
याचा अर्थ तुमच्या कल्याणासाठी या ऐसा होतो.
पुन्हा
अल्लाह हु अकबर
ला यी लाहा इलेलेलाह
दिवासातुन पाच वेळेस अजान आणि नमाज होते चार वेळेस हीच अजान असते मात्र सकाळच्या वेळेस जी अजान होते त्यात
हैइया ललफलाह
नंतर एक ओळ म्हटली जाते की
अस्सलातु खैरुम मिनन नौम
याचा अर्थ ऐसा होतो की
झोंपे पेक्षा नमाज कितीतरी चांगली आहे.
अजानच्या वेळेबाबत म्हणाल तर अजान आणि नमाज ही ठरलेल्या पक्क्या वेळेवरच होत असते नमाज आणि अजान ची वेळ कोणासाठी ही मागेपुढे केली जात नाही.
तर मित्रांनो अज़ान बद्दल मला माहीत असलेली माहिती मी तुम्हाला दिली आहे. यात काही चूक असेल तर ती माझ्या ज्ञानात आहे, माझ्या समजन्यात आहे
अशी चूक निदर्शनात आली तर मला उदार मणाने क्षमा करा आणि चूक मात्र सांगा म्हणजे पुढच्या वेळेस माझ्याकडून होणार नाही.
ग्रंथमित्र नईमखान श. पठाण
निफाड नासिक