क्षेत्रभेट -देवळा पोलिस स्थानक
परिसर क्षेत्रभेट: पोलिस स्थानक देवळा
परिसर क्षेत्रभेट: पोलिस स्थानक देवळा
मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी द्याव्या या उद्धेशाने आम्ही शाळेतील मुलांसह आज देवळा पोलिस स्थानकास काळ्खडी व फांगदर शाळेच्या विद्यार्थ्यान समवेत भेट दिली.
विध्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी मुल शालेय प्रवाहात यावेत टिकावेत व टिकल्यावर शिकावेत म्हणुन ह्या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यामागचा आमच्या शाळांचा उद्देश.
माघील वर्षीच रायझिंग डे आमच्या शाळेत साजरा करावा अशी मागणी मी पोलिस निरीक्षक साहेबांना केली होती.या वर्षी मागील आठवड्यात सतिश माने पोलिस निरीक्षक देवळा यांची परवानगी घेत आज विध्यार्थ्यांसमवेत भेट दिली.
विध्याथीं व शिक्षकांचे पोलिस हवालदार मनोज बच्छे यांनी स्वगत केले. पोलिस स्थानकात लोक का येतात हे त्यांनी विध्यार्थ्यांना सांगितले.तक्रारी द्यायला आलेल्या नागरिक पोलिस स्थानकात आल्यावर ठाणे अंमलदाराकडे येतात याचे सविस्तर विवेचन यावेळी विध्यार्थ्यांना केले.
त्यांतर पोलिस स्थानकाचा कारभार कोणकोणत्या शाखेतुन केला जातो.याचे सविस्तर माहिती विध्यार्थ्यांना करून देण्यात आली.गोपनीय शाखेत व्यक्तीची चारित्र पडताळणी तशेच पारपत्र तयार करण्यासाठी या शाखेचा वापर करतात असे सांगितले.यानंतर बिनतारी संदेश यंत्रणा विभागात असलेल्या यंत्रणेची ओळख करून दिली.आमच्या क्षेत्रभेटीच्या उपक्रमास शुभेछ्या देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सतिश बच्छाव आले असता संदेश यंत्रणेद्वारा कसे कामकाज चालते याचे प्रात्यक्षिक करण्याची यावेळी विनंती केल्यावर गायकवाड दादा व बच्चे दादांनी संदेश यंत्रणेवर विध्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
,गुन्हे शाखेत काय कामकाज केले जाते याची सविस्तर माहिती पुढील दालनात देण्यात आली.यानंतर पोलिस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या दालनांची माहिती विध्यार्थ्यांना देण्यात आली.
त्यानंतर कोठडीची ओळख करून देतांना महिला व पुरुष कोठड्या विध्यार्थ्यांना दाखवण्यात आल्यात.आरोपी आणल्यानंतर ह्या पोलिस कोठडीत त्यांना ठेवण्यात येते.तशेच विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष बेड्या दाखवण्यात येऊन त्यांचा वापर केंव्हा केला जातो हे सांगितले.यानंतर विध्यार्थ्यांना सभागृहात बसवण्यात येऊन पोलिस वापरत असलेल्या शश्रांची ओळख करून देण्यात आली.
यात पोलिस हवालदार मनोज बच्चे यांनी विध्यार्थ्यांना पोईंट थ्रीनॉट थ्री व एस एल आर ह्या रायफल विषयी माहिती दिली.यावेळी विध्यार्थ्यानी बंदुक कोणाकडे असतात ?बंदुकीत किती गोळ्या असतात?आम्हाला सगळी माहिती सांगा?पोलिसांना काय काय कामे करावे लागतात?गोळीबार केंव्हा करतात?बंदुक चालवण्यासाठी काय करावे लागते.बंदुक कोनाकडे असते?गोळ्या कोठून आणतात?पोलिसांची काठी कोणत्या झाडाची असते?सद्रक्षणाय खलनिग्रन्हाय या वाक्याचा अर्थही विध्यार्थ्यानी यावेळी पोलिस दादांना विचारला.असे नानाविध प्रश्न विध्यार्थ्यानी यावेळी पोलिसांना विचारले.विद्यार्थ्यांच्या ह्या जिज्ञासा जागृत करणाऱ्या प्रश्नांना सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.जि.साबळे यांनी समर्पक उत्तरे दिलीत.यावेळी विध्यार्थ्यांना ह्या दोघाही शस्रानां यावेळी हाताळू दिले.पोलिसांच्या बंदुकीला पहिल्यांदाच हात लावण्याचा आनंद प्रत्येक विध्यार्थ्यांना यावेळी घेता आला.
पोलिस स्थानकातील संपुर्ण माहिती विध्यार्थ्यांना सविस्तर दिल्याबद्दल काळखडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील व आनंदा पवार यांनी शाळेच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.जी.साबळे,पोलिस हवालदार मनोज बछ्ये व गायकवाड,सावकार यांचे आभार मानले.भेटी दरम्यान विध्यार्थ्यांना उपशिक्षक खंडु मोरे व समाधान शेवाळे यांनी पोलिस स्थानकात विद्यार्थ्यांची व्यवस्था पहात विध्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करू दिल्या.

देवळा तालुक्याच्या पोलिस स्थानकात क्षेत्रभेटी दरम्यान पोलिस स्थानकांचा व पोलिसांचा दैनंदिन कारभार पाहिल्यावर विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचा चौकस प्रश्नांच्या विचारण्याच्या वृत्तीतून त्यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावल्या ह्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून जाणवले.
विद्यार्थ्याचा आनंद हा त्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मुळ गाभा असल्याचा व मुलांच्या क्षमतांना वाव देण्यासाठी या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे शिकणे व शिकवणे हे नित्याचे काम न होता एक सर्वांगसुंदर अनुभव झाला हे आजच्या क्षेत्रभेटीच्या कार्यातून आम्हाला जाणवले.
ह्या क्षेत्रभेटीत विध्यार्थ्यांच्या अमाप प्रश्नांना समर्पक व विध्यार्थ्यांना समजतील अश्या भाषेत पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांनी उत्तरे दिली.या क्षेत्र भेटी दरम्यान वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सतिश बच्छाव व खामखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख शिरीष पवार साहेब,वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक मोठाभाऊ पगार,ब्राम्हणकर शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पोलिस स्थानकात आल्याबद्दल तशेच विध्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांना अनुरूप माहिती दिल्याबद्दल पोलिस निरीक्षक सतिश माने साहेबांचे दोघाही शाळांच्या वतीने आभार मानण्यात आले.

सर्वसामान्य माणुस सहजासहजी पोलिस स्थानकाची पायरी चढत नाही.विद्यार्थ्यांच्या मनातही ह्या अनामिक प्राण्याविषयी भीतीच अधिक असते.मात्र आजच्या या पोलिस स्थानकाच्या भेटीतुन विध्यार्थ्यानी पोलिस आपला मित्र असतो.कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या ह्या घटकाला जवळुन पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडुन व्हाताना आम्ही आज पहिले.तशेच सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जि साबळे या पोलिसातील माणुसही आम्हला वाचता आला.विद्यार्थ्यांच्या स्मृती पटलावरून आयुष्यभर पुसला जाणार नाही असा अनुभव प्रत्यक्ष दिल्याचा आनंदही आमच्याही शैक्षणिक प्रवासात सदैव स्मरणात राहील.
शब्दांकन श्री खंडु मोरे,उपशिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर ता देवळा.जिल्हा नाशिक