Monday, May 6, 2019

अक्षय तृतीया हा खानदेशातील महत्त्वाचा सण. खंडू मोरे,नाशिक.

अक्षय तृतीया हा खानदेशातील  महत्त्वाचा सण.
खंडू मोरे,नाशिक.

उत्तर महाराष्ट्रातील खानदेशच्या संस्कृतीत दिवाळी व आखाजीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त खानदेशातील एक महत्त्वाचा सण खान्देशात त्याला आखाजी म्हणून संबोधले जाते. सासुरवाशीन म्हणजे गौराई आणि जावई म्हणजे शंकर अशा या गौराई आखाजीला माहेरी येतात.

 माहेरी त्यांचे कोडकौतुक केले जातं. आमरस पुरणपोळीचे जेवण व शेतात झाडांना झोके बांधून आखाजीची गाणी गप्पा गोष्टी असं चित्र खानदेशातल्या ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणावर दिसत असे आजही थोड्याफार प्रमाणात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होताना दिसतो अशा या सणाची ओळख.

   चैत्र पौर्णिमेला गवरायीची स्थापना केली जाते.आखाजीच्या दिवशी या चैत्र गौरीचे विसर्जन केले जाते.याच दिवशी तृतीयेला   आखाजी हा सण साजरा केला जातो.

 मातीची घागर व मातीचे १ लोटे कुंभाराकडून विकत आणले जाते. हि घागर व लोटे पाण्याने पूर्ण भरून त्यावर खानदेशी मांड्याची पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला जातो. याबरोबरच भात, सार, कुरडया, आंब्याचा रस असे सुग्रास जेवण बनवले जाते. घराघराच्या दरातील झाडांना झोके बांधले जातात. झोक्यावर बसणाऱ्या सासुरवासिनी गौराईची व आखाजीची गाणे म्हणत झोके घेतात.

चैत्र महिन्यात असणारे ऊन,त्याचा आशय असणारे एक गीत नेहमी आखाजीला म्हटले जाते ते अशे ------


चैत वैशाख न उन्ह वं  माय

खडकं तापी जयात लाल वं  माय 

गौराईना पायले वनात फोड वं  माय

गौराईन्या बेगडी वाहणा वं माय

तठे काय कन्हेरन झाड वं माय.

कसमादे भागात व खानदेशात असणारे रणरणते ऊन त्याचा होणारा त्रास तसेच गौराई वरची श्रद्धा या गाण्यातून आपणास दिसते. उन्हाळ्यात येणारा हा सण त्यात आंब्यांचा हा हंगाम असतो.वाऱ्यावर झोके घेणाऱ्या या कैऱ्यावर आधारित अजून एक गाणे म्हटले जाते ते पुढीलप्रमाणे


आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाये वं.

कैरी तुटी न खडक फुटणा झुळझुळ पाणी वाहे वं.

झुळझुळ पाणी वाहे तठे कसाना बझार वं.


झुळझुळ पाणी वाहे तठे बांगड्यास्ना बझार वं.


  एप्रिल व मे महिन्यात आंब्याचा बहर असतो व ह्याच वेळी घरात गौराई बसविली जाते त्याचा पूर्ण आशय या गाण्यात येतो.

गौराई व शंकर यांची एकत्रित नावे गुंफून हि काही गीते म्हटली जातात. या गाण्यात आखाजीचे दिवस संपल्याचा उल्लेख येतो. गौराईचे विसर्जन होण्याची वेळ येते. म्हणजे सासुरवाशिणीची सासरी परतायची वेळ होते. गौराईचा नवरा तिला रथ घेऊन घ्यायला येतो त्या अर्थाचे वर्णन या गीतात येते.


गडगड रथ चाले गौराईना बहुतेक आनंदना.

सोळा साखळ्या रथले अन बावन खिडक्या त्याले .

गौराई  बसनी  रथमझार चिंता शंकरले.

अशी अनेक गाणी गाऊन उन्हाळ्यातील या सणाचा गोडवा द्विगुणीत केला जातो.घरातील आबालवृद्ध या सनात सणामध्ये सहभागी होतात. लहान मुलांना उन्हाळ्यात भरपूर सुट्ट्या असतात. आजच्या स्पर्धेच्या युगात वर्षभर मुलांच्या शाळेमुळे माहेराला सासुरवाशीण स्रियांना जायला जमत नाही. पण हि दीर्घ सुट्टी असल्याने व उन्हाळ्यात कामांचे प्रमाण कमी असल्याने सार्वजन एकत्र जमतात व या गोड सणाची मजा लुटतात.

 सासुरवाशीन गौराई सासरी जातांना निरोप घेतांना तिच्या आईच्या व तिच्या डोळ्यात अक्षरश पाणी येते. आता मोठा सन हा फक्त दिवाळीचाच आहे. म्हणजे सहा महिने भेट होणार नाही याचे दुख तिला वाटते.दाटून आलेला कंठ व भरल्या आवाजात ती म्हणते कि माझ्या भावाला तू पाठवू नको. रस्त्याने दाट अशी आमराई आहे. आमराईत दाट अश्या जंगलात त्याचा जीव घाबरेल अशे ती सांगते व मोठ्या भावाला दिवाळीला ग्यायला पाठव असे ती सांगते.


आखाजी दिवाळी सा महिनानी लाम्हन .जमनं ते मझार दसरा जमीन.


अश्या प्रकारे आखाजी या सणाला कसमादेत आबालवृद्ध मज लुटतात. पूर्वी रहदारीची साधने कमी होती. प्रसार माध्यमे नव्हती. करमणुकीची साधने अजिबातच नव्हती. जागतिकीकरणाची वारे वाहत नव्हते. पण आज काळ बदलला, मानसे बदलली, पण सणाचे महत्व काहीका असेना परंपरेने अबाधित ठेवले. त्यामुळे नात्यातील गोडवा व ग्रामीण शहरीतला एकत्रितपणा आपल्याला दिसून येतो. 

Friday, March 15, 2019

DREAMS SCHOOL फांगदर ता देवळा(नाशिक): #अजान

DREAMS SCHOOL फांगदर ता देवळा(नाशिक): #अजान: # अजान आपल्या गावात, शहरात जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे अश्या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी म्हणजेच अल्लाह भक्ति करण्यासाठी मस्जिद असते आणि ह्...

#अजान

#अजान
आपल्या गावात, शहरात जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे अश्या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी म्हणजेच अल्लाह भक्ति करण्यासाठी मस्जिद असते आणि ह्या मस्जिद मधून लाउडस्पीकर वर दिवसातून 5 वेळेस जोरात उंच आवाजात अरबी भाषेत काही वचन म्हटल्याचे आपल्या कानी पडतच असेल तर त्या वचनाला किंवा श्लोकाला अजान ऎसे म्हटले जाते.
मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधला तर त्याचाहि आवाज अल्लाह किंवा परमेश्वराच्या काना पर्यंत पोहोचतो तर हा माणूस इतक्या जोर जोरात अल्लाह किंवा परमेश्वरा ला का पुकारतो आहे ऐसा बहुतेक जणांचा समज आहे, मात्र मस्जिद मधून पाच वेळेस जी अजान पुकारली जाते त्याचा उद्देश परमेश्वराची किंवा अल्लाह प्रार्थना नाही तर श्रद्धावान भाविकांना नमाज साठी आमंत्रण असते आवाहन असते.
फार पूर्वी घड्याळीचा शोध लागलेला नव्हता आणि दिवसातून पाच वेळ नमाज ची निश्चित वेळ ठरलेली असते मात्र वेळ समजत नसल्याने नमाज ची वेळ चुकु नये म्हणून एक व्यक्ति दिवसातून 5 वेळेस ठरलेल्या वेळी अजान देत असते अजान देणाऱ्या व्यक्तीला मुअज्जिन ऎसे म्हणतात.
अजान देणारी व्यक्ति वुजू { तोंड हाथ पाय स्वच्छा धुनें }करून काबा कड़े {पश्चिमे कड़े }तोंड करून उंच जागेवर उभे राहून कानात बोट टाकून जोरात आणि खड्या आवाजात अजान पुकारतो आणि भाविकांना नमाज ला येण्यासाठी आवाहन करत असतो.
ती अज़ान आणि तिचा मराठी अनुवाद माझ्या बौद्धिक कुवती प्रमाणे देत आहे.
अल्लाह हु अकबर 2
अल्लाह हु अकबर 2
अशाहदुअल्लायलाहा इलेलाह 2
अशादुआंना मुहमदुर रसुलल्लहा 2
हैय्या ल सलाह 2
हैय्या लल फलाह 2
अल्लाह हु अकबर 2
अल्लाह हु अकबर
ला ई ला हां इलेल्लाह
अशी अजान असते
आता आपण अजान चा मराठी अनुवाद बघुया तो समजने महत्वाचे आहे.
पहिल्यांदा अजान देणारा
अल्लाहु अकबर ऎसे चार वेळेस म्हणतो त्याचा अर्थ ऐसा होतो की
अल्लाह म्हणजे परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे.
पुढे तो म्हणतो
अशादुअल लाईलाह इलेलेलाह
याचा अर्थ
अल्लाह म्हणजेच परमेश्वरा शिवाय कोणीही उपासने योग्य नाही याची मी ग्वाही देतो.
अशादुअन्ना मुहमदर रसूल अल्लाह
याचा अर्थ
होय मुहम्मद पैगंबर हे अल्लाह चे परमेश्वराचे प्रेषित आहेत मी याचीही ग्वाही देतो.
पुढची ओळ आहे
हईय्या लल सलाह
याचा अर्थ होतो
नमाज साठी या.
पुढची ओळ आहे
हाई या लल फलाह
याचा अर्थ तुमच्या कल्याणासाठी या ऐसा होतो.
पुन्हा
अल्लाह हु अकबर
ला यी लाहा इलेलेलाह
दिवासातुन पाच वेळेस अजान आणि नमाज होते चार वेळेस हीच अजान असते मात्र सकाळच्या वेळेस जी अजान होते त्यात
हैइया ललफलाह
नंतर एक ओळ म्हटली जाते की
अस्सलातु खैरुम मिनन नौम
याचा अर्थ ऐसा होतो की
झोंपे पेक्षा नमाज कितीतरी चांगली आहे.
अजानच्या वेळेबाबत म्हणाल तर अजान आणि नमाज ही ठरलेल्या पक्क्या वेळेवरच होत असते नमाज आणि अजान ची वेळ कोणासाठी ही मागेपुढे केली जात नाही.
तर मित्रांनो अज़ान बद्दल मला माहीत असलेली माहिती मी तुम्हाला दिली आहे. यात काही चूक असेल तर ती माझ्या ज्ञानात आहे, माझ्या समजन्यात आहे
अशी चूक निदर्शनात आली तर मला उदार मणाने क्षमा करा आणि चूक मात्र सांगा म्हणजे पुढच्या वेळेस माझ्याकडून होणार नाही.
ग्रंथमित्र नईमखान श. पठाण
निफाड नासिक

Wednesday, February 6, 2019

खडकाळ माळरानावरील नंदनवन वाचवण्यासाठी सोशियल माध्यमातुन मदत

खामखेडा ता देवळा येथील फांगदर येथील प्राथमिक शाळेने अतिशय बिकट परिस्थितीत उजाड माळरानावर विध्यार्थी,शिक्षक व पालक ग्रामस्थांच्या मदतीने शालेय आवारात तीनशेहून अधिक झाडे जगवलित ह्या झाडांसाठी शालेय आवारात केलेले बोरवेलचे आटल्याने पाण्याचा थेंब तसेच विध्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी  देखील मिळणे दुरापास्त होते.हि गंभीर अडचण सोडवण्यासाठी शाळेला सोशियल माध्यमातुन आर्थिक मदत मिळत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकला.






                 विध्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी व अतिशय प्रतिकुल परिस्थितीत वाढवलेली वनराई दुष्काळात मात्र पाणीच आटल्याने जगवायची कशी हा यक्षप्रश्न शिक्षकांपुढे होता.शाळेजवळील शेतकरी संजय धर्मा बच्छाव व भाऊसाहेब उमाजी देवरे यांनी आपल्या विहिरी वरून पाणी घेऊन जा असा शब्द दिला.मात्र आर्थिक परिस्थिती अभावी ६०० फुटावरून पाणी आणण्यासाठी तिन इंची पाईपलाईन व खडकाळ जागेवरून खोदाईसाठी (जेसिपीज)ने शाळेला विस हजाराहून अधिक खर्च येण्याची शक्यता व पैशांची आवश्यकता होती.
        ह्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावायासाठी शाळेचे शिक्षक खंडू मोरे यांनी सोशियल माध्यमात आवाहन केले होते.ह्या आवाहनास मुळचे नाशिक व नोकरीनिमित्त परदेशात असणारे दोहा,कतार येथील रविंद्र नारायण आहेर यांनी १५ हजार व अंगोला देशात मॅकेनिकल इंजिनियर असलेले दिपक भामरे यांनी ५ हजाराची आर्थिक मदत,शिक्षक संजय धोंडगे अकराशे रुपयांची मदत तशेच खामखेडा वन विभागाचे वनरक्षक शांताराम आहेर यांनी सहा तास जेसीपी उपलब्ध करून देत शाळेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला.
    आदिवासी वस्तीवरील प्राथमिक शाळेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी परदेशात असुन देखील ग्रामीण भागातील शाळेला मदत केल्याबद्दल मुख्याध्यापक संजय गुंजाळ व शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी देणगीदारांचे आभार मानले.






बागेत झाडांना पाणी भरताना मुले 






          आपले काम अश्वासक असेल तर आपणास कुटूनहि मदत मिळू शकते.फांगदर शाळा व शिक्षकांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शाळेचा विकास घडवुन आणला.म्हणुन सोशियल माध्यमातुन परदेशातून मिळालेली मदत शिक्षण विभागाच्या दृष्टीने भुषणावह आहे.
सुनिता धनगर,गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती देवळा.
वृत्त पत्रांनी घेतलेली दखल.


खडकाळ माळरानावरील नंदनवन वाचविण्यासाठी सोशल ‘फंडा’ यशस्वी - https://www.deshdoot.com/nashik-news-fangdar-digital-school-khamkheda-deola-breaking-news/




खडकाळ माळरानावरील नंदनवन वाचविण्यासाठी सोशल ‘फंडा’ यशस्वी - https://www.deshdoot.com/nashik-news-fangdar-digital-school-khamkheda-deola-breaking-news/

Wednesday, January 16, 2019

DREAMS SCHOOL फांगदर ता देवळा(नाशिक): विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्...

DREAMS SCHOOL फांगदर ता देवळा(नाशिक): विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्...: विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल फांगदर शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत केले मुलीच्या जन्माचे स्वागत. ...
विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल फांगदर शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत केले मुलीच्या जन्माचे स्वागत.




विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल फांगदर शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत केले मुलीच्या जन्माचे स्वागत.

पुणे येथील अभियंता विलास सूर्यवंशी व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल मुलीच्या जन्माचे स्वागत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत साजरे केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर मॅडम होत्या.ऐन थंडीच्या कडाक्यातच ऊब मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.
मुंगसे ता मालेगाव येथील व सध्या पुणे येथे सिमेंसग्रुप मध्ये अभियंता असलेले माझे मावस बंधु विलास बाबुलाल सुर्यवंशी व त्यांच्या पत्नी वंदना सुर्यवंशी या उभयांतानी मुलगी झाल्यास शाळेतील मुलांना शैक्षणिक मदत करणार असल्याचे सांगितले होते.अलिकडे वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी शालेय पटावर देखील याचा मोठा विपरीत परिणाम होत असतो.हि बाब लक्ष्यात घेत.
या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये.व विध्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणुन सुर्यवंशी दांपत्याने आमच्या फांगदर येथील शाळेच्या ६५ विध्यार्थ्यांना ऊबदार स्वेटर उपलब्ध करून दिले.
जिल्हा परिषद फांगदर शाळेतील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत असतात.व समाजाकडून विध्यार्थी व शाळा विकासासाठी मदत मिळवत असतात.सुर्यवंशी दांपत्याने मुलीच्या जन्माचे विधायक स्वागत नक्कीच प्रेरक असल्याचे गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांनी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी नंदू देवरे,केंद्र्प्रमुक शिरीष पवार,विश्वनाथ बैरागी,सरपंच उखड्याबाई पवार,उपसरपंच बापु शेवाळे,माजी सरपंच दादाजी बोरसे,आमचे जेष्ठ बंधु पोपटराव सुर्यवंशी,पो हवा समाधान पगार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद मोरे,उपाध्यक्ष सागर पवार,माजी सरपंच नानाजी मोरे,संजय बच्छाव,दत्तु पवार,भाऊसाहेब देवरे,हरी माळी,पालक उपस्थित होते. सुर्यवंशी दांपत्याच्या  या सेवाभावी कार्याचे- पालक- शिक्षक यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. 
यावेळी विलास सुर्यवंशी ,पोपटराव सुर्यवंशी या दोघा बंधूंचे शाळेच्या वतीने गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Tuesday, January 15, 2019

शाळेत साजरा झाला रेझिंग डे

पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे,परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक निकम,गोपनीय अभिलेक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे आदि यावेळी उपस्थित होते.



देवळा पोलीस स्थानकाच्या वतीने पोलिस दल स्थापना दिन (रेझिंग डे) आज तालुक्याच्या शेवटच्या गावाच्या आदिवासी वस्तीवरील फांगदर(खामखेडा) प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे यांनी पोलीस दलाकडून वापरली जाणाऱ्या हत्यारांची ओळख करून ते विध्यार्थ्यांना हाताळण्यास दिली.विध्यार्थ्यांना एसएलआर रायफलविषयी मार्गदर्शन केले.बुलेट,मॅगजीन,गण लोडिंग,फायरिंग,पिस्टल व त्याचे बुलेट,अश्रूधुर नळकांडे,लाठी व लाठी चार्ज,बेड्या याविषयी विध्यार्थ्यानी विचारलेल्या शंका,प्रश्नाविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉग स्क्वॉडसह इतर स्क्वॉडबाबतही माहिती या वेळी विध्यार्थ्यांना देण्यात आली.






देवळा पोलीस स्थानकाच्या वतीने पोलिस दल स्थापना दिन (रेझिंग डे) आज तालुक्याच्या शेवटच्या गावाच्या आदिवासी वस्तीवरील फांगदर(खामखेडा) प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला.देवळा पोलीस स्थानकाच्या वतीने पोलिस दल स्थापना दिन (रेझिंग डे) आज तालुक्याच्या शेवटच्या गावाच्या आदिवासी वस्तीवरील फांगदर(खामखेडा) प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे,परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक निकम,गोपनीय अभिलेक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे आदि यावेळी उपस्थित होते.
         रेझिंग डे निमित्ताने विध्यार्थ्यांना पोलिसांचे कर्तव्य,भुमिका,समाजातील स्थान  याविषयी माहिती दिली.पोलीस हे आपले मित्रच असतात.कुठलेही दडपण न ठेवता आपल्या तक्रारी त्यांच्याकडे मांडल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना कार्यक्रमात पोलिसांच्या विविध विभागाची माहिती, व पोलिसांच्या दैनंदिन कामाकाजाची,पोलीस दलाविषयी सविस्तर माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी देऊन रेझिंग डे शाळेत उत्साहात साजरा केला.
           यावेळी पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे यांनी पोलीस दलाकडून वापरली जाणाऱ्या हत्यारांची ओळख करून ते विध्यार्थ्यांना हाताळण्यास दिली.विध्यार्थ्यांना एसएलआर रायफलविषयी मार्गदर्शन केले.बुलेट,मॅगजीन,गण लोडिंग,फायरिंग,पिस्टल व त्याचे बुलेट,अश्रूधुर नळकांडे,लाठी व लाठी चार्ज,बेड्या याविषयी विध्यार्थ्यानी विचारलेल्या शंका,प्रश्नाविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉग स्क्वॉडसह इतर स्क्वॉडबाबतही माहिती या वेळी विध्यार्थ्यांना देण्यात आली.तालुक्यातील छोट्याश्या वस्तीवरील प्राथमिक शाळेत पोलीस स्थानकाच्या वतीने रेझिंग डे निमित्ताने कार्यक्रम घेतल्याबद्दल मुख्याध्यापक संजय गुंजाळ यांनी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व पोलीस स्टेशनचे आभार मानले.शिक्षक खंडू मोरे यांनी सुत्रसंचालन केले.
  
आदिवासी शेतमजुरांच्या वस्तीवरील प्राथमिक शाळेत विध्यार्थी विकासासाठी राबवले जात असलेले नाविन्यपुर्ण उपक्रमामुळे तालुक्याच्या आदिवासी वस्तीवरील शाळेत रेझिंग डे साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे देवळा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.

     पोलिस स्थानकाच्या ह्या शाळा भेटीतुन विध्यार्थ्यानी पोलिस आपला मित्र असतो.कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या ह्या घटकाला जवळुन पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलाहेच या उपक्रमाचे खरे यश आहे.विद्यार्थ्यांची जिज्ञसा वृत्ती त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून दिसुन आली.पोलिस ते देखील आपल्या शाळेवर पहायला मिळालेत.पोलिस वापरत असलेले हत्याराना हाताळायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे गारुड शाळा सुटेपर्यत अनुभवायला मिळाले.