विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल फांगदर शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत केले मुलीच्या जन्माचे स्वागत.
विलास व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल फांगदर शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत केले मुलीच्या जन्माचे स्वागत.
पुणे येथील अभियंता विलास सूर्यवंशी व वंदना सुर्यवंशी दांपत्याने मुलगी झाल्याबद्दल मुलीच्या जन्माचे स्वागत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऊबदार स्वेटरचे वाटप करत साजरे केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर मॅडम होत्या.ऐन थंडीच्या कडाक्यातच ऊब मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.
मुंगसे ता मालेगाव येथील व सध्या पुणे येथे सिमेंसग्रुप मध्ये अभियंता असलेले माझे मावस बंधु विलास बाबुलाल सुर्यवंशी व त्यांच्या पत्नी वंदना सुर्यवंशी या उभयांतानी मुलगी झाल्यास शाळेतील मुलांना शैक्षणिक मदत करणार असल्याचे सांगितले होते.अलिकडे वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी शालेय पटावर देखील याचा मोठा विपरीत परिणाम होत असतो.हि बाब लक्ष्यात घेत.
या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये.व विध्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणुन सुर्यवंशी दांपत्याने आमच्या फांगदर येथील शाळेच्या ६५ विध्यार्थ्यांना ऊबदार स्वेटर उपलब्ध करून दिले.
जिल्हा परिषद फांगदर शाळेतील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत असतात.व समाजाकडून विध्यार्थी व शाळा विकासासाठी मदत मिळवत असतात.सुर्यवंशी दांपत्याने मुलीच्या जन्माचे विधायक स्वागत नक्कीच प्रेरक असल्याचे गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांनी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी नंदू देवरे,केंद्र्प्रमुक शिरीष पवार,विश्वनाथ बैरागी,सरपंच उखड्याबाई पवार,उपसरपंच बापु शेवाळे,माजी सरपंच दादाजी बोरसे,आमचे जेष्ठ बंधु पोपटराव सुर्यवंशी,पो हवा समाधान पगार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद मोरे,उपाध्यक्ष सागर पवार,माजी सरपंच नानाजी मोरे,संजय बच्छाव,दत्तु पवार,भाऊसाहेब देवरे,हरी माळी,पालक उपस्थित होते. सुर्यवंशी दांपत्याच्या या सेवाभावी कार्याचे- पालक- शिक्षक यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे.
यावेळी विलास सुर्यवंशी ,पोपटराव सुर्यवंशी या दोघा बंधूंचे शाळेच्या वतीने गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment