Tuesday, October 30, 2018

आमच्या शाळेचे वैशिष्टे


1.      शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर
2.      शाळेची स्थापना : २ जुलै २००१
3.      शाळेचे ब्रीदवाक्य : धरूया शिक्षणाची कास करूया वस्तीचा विकास
4.      पत्ता: मु. मु.पो.खामखेडा ता.देवळा.जिल्हा-नाशिक.
5.      महसूल गावाचे नाव :- खामखेडा
6.      शाळेचे केंद्र :- खामखेडा
7.      शाळेचा प्रवर्ग :- १ ली ते ४ थी
8.      शाळेचा EMIS संकेतांक क्रमांक : २७२००३०२१०४
9.      शाळेचे वर्णन :-
1.      सर्व शिक्षा अभियान यांच्या वतीने   आरसीसी बांधकाम
2.      जि.प. शाळा उत्तर-दक्षिण  असुन शाळा पूर्वाभिमुख आहे.
3.      वर्गखोल्या:२  खोल्या
4.      ऑफिससुविधा आहे.
5.      स्वच्छतागृह:मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १ युनिट (२ + १TOILET)
6.      अपंगासाठी रंप सुविधा आणि कमोड TOILET सुविधा
7.      खेळाचे साहित्य: ढोल,खंजिरे, दोरीउड्या, बॉल, चेंडू, कार्यानुभावाचे साहित्य,लेझीम,डम्बेल्स,टिपरी निशाण कवायत साहित्य आहे.
8.      प्रयोगशाळा: छोटे-छोट्या प्रयोगासाठीचे साहित्य उपलब्ध आहे.
9.      बाग:अतिशय सुंदर बाग आहे.बागेत औषधी बगीचा असून तीनशेहून अधिक झाड लावलेली आहेत.
10.    पिण्याचे पाण्याची टाकी:आहे मुबलक पाणी व्यवस्था (२ टाक्या)आहेत.
11.    मैदान: आहे .मैदानावर पेवर ब्लॉक असून सर्वांग सुंदर मैदान आहे.त्यात घसरगुंडी, सी-सॉ,झोपाळा  मनोरा इ. शैक्षणिक साहित्य: आवश्यक:आहे
10.    शाळेतील विद्यार्थी संख्या : मुले – २८   मुली-२३ आणि एकूण-५१
11.    शाळेतील शिक्षक/कर्मचारी संख्या : दोन २
12.    शाळेमार्फत देण्यात येणारी सुविधा/ वैशिष्ट्ये :
1.      विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे अध्यापन.
2.      प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी
3.      परिसर क्षेत्र भेट सहली
4.      पिण्यासाठी स्वच्छ पाणी
5.      संगणकाचे शिक्षण चार संगणक,प्रोजेक्टर,स्मार्ट बोर्ड च्या सहाय्याने अध्यापन केले जाते.
6.      शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दर्जेदार पोषण आहार,स्वतंत्र स्वयंपाक गृह.
7.      इ-लर्निंग सॉफ्टवेअर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण.
8.      पालक मेळावा आयोजन पालकांचे प्रबोधन केले जाते.
9.      तज्ञ व नामांकित मान्यवरांचे शाळा भेट व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन.
10.    विद्यार्थ्यांचा  कलागुणांना वाव विध्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न.
11.    विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्था,दानशूरांकडून शैक्षणिक साहित्याची उपलब्धता.करून देण्यात येते.
1.      शाळेला मिळालेले महत्वाचे ठळक  पुरस्कार :
1.      शैक्षणिक वर्ष २०१५ -१६ राज्यशासनाच्या मूल्यमापनात शालेस गुणवत्तेचा दर्जा प्राप्त व तालुका स्तरीय गुणवत्ता विकासात तृतीय क्रमांक.
2.      शैक्षणिक वर्ष २०१७/१८ –नाशिक जिल्ह्यातील किनो एजुकेशन संस्थेच्या वतीने  जिल्हा स्तरीय आदर्श  आदर्श शाळासन्मान चिन्ह व बक्षीस  प्राप्त.
3.      लोकमत समूहाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकात झेडपिच्या डिजिटल शाळा ह्या लेखात शाळेच्या उपक्रम अडीच लाख प्रतींचा खप.
4.      संतोष सोनवणे लिखित गुरुमंत्र ह्या राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या लेखाजोखा ह्या पुस्तकात शाळेची यशोगाथा.
5.      लोकसत्ता ह्या दैनिकाच्या आठवड्याची शाळा ह्या सदरात शाळेच्या उपक्रमांची दखल.
6.       


Tuesday, March 13, 2018

सलाम दिंडोरीतल्या सखुबाई व मुंबईतल्या मनश्री पाठक या दोघींना.


सलाम दिंडोरीतल्या सखुबाई व मुंबईतल्या  मनश्री पाठक या दोघींना.

                               सूर्य आग ओकत होता... चालून चालून पाय सुजले होत... पायाला आलेले फोड फुटून पायातून रक्त वाहत होतं.. पण अन्नदात्याने निर्धार केला होता.तो आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्याचा. शेतकऱ्यांच्या मोर्चातले काही मन हेलावून टाकणारे फोटो व व्हिडीओस  माध्यमात व  सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

                         असाच एक फोटो होता पायाला गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या दिंडोरी च्या सखुबाई आज्जींचा.या मोर्चामध्ये विनाचप्पल चालल्याने सखुबाई या वृद्ध आजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली.व डॉक्टरांनी  आजींना हॉस्पिटलमध्ये उपचार आवश्यक असल्याचं  सांगितलं असतांना देखील जीवाची पर्वा न करता त्या मोर्चासोबतच राहिल्या.आपलं दुखं,दुखापतिकडे दुर्लक्ष करत माझी हक्काची जमीन मला मिळावी आणि माझ्या सारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथेच थांबणार असा निर्धार अख्या महाराष्ट्राने पाहिला.म्हणून या दुर्दम्य अशावादास सलाम.

                            शहरी लोकांच्या संवेदना  बोथट होत चाललेल्या अनेकांनी पावलोपावली अनुभवलेल्या घटना रोजच घडत पहात असतांना एबीबी माझाची प्रतिनिधी असलेल्या मनश्री पाठक या तरुण भगिनीने गंभीर जखम होऊनही मोर्चात शेवटपर्यंत रहाण्याचा निर्धार करणाऱ्या सखुबाई आज्जीच्या रक्ताळलेल्या तळपायाच्या जखमा बघून तिच्या पायांत स्वतःच्या हाताने चप्पल घातली.
                 मनश्री तू माणूस असल्याचे तुझ्या कृतीतून दाखवून दिले आहेस हे दृश्य बघून माणुस असणार्या करोडोंचे काळीज कळवळले.डोळ्यांत पाणी आले........ 

              या पार्श्वभूमीवर मनुश्री तुझ्या ठायी असलेली सहृदयता अख्या राष्ट्राला  दिसली. सलाम तुझ्या ह्या छोट्याश्या मात्र डोंगरा एवढ्या कृतीला.
                         मनश्री तुझ्यातले माणूसपण ह्या घटनेतून पहावयास मिळाले ... तुला सलाम...
श्री.खंडू मोरे,प्राथमिक शिक्षक
जि.प.शाळा.फांगदर ता देवळा नाशिक.

Thursday, March 8, 2018

अहिराणी लोकगीतातील आई सप्तशृंगी

अहिराणी लोकगीतातील आई सप्तशृंगी 
"सप्तशृंग" म्हणजे सात डोंगरांचा समुदाय, नांदुरीजवळ असणार्या पर्वतरांगेला "सप्तशृंग" असे म्हटले जाते. त्यापैकी एका शिखरावर या देवीचे वास्तव्य आहे. "सप्तशृंग" स्थळी वास्तव करते ती "सप्तशृंगी" साडेतीन पीठांपैकी हे अर्धे पीठ आहे. शेजारी मार्कंडेय पर्वत आहे.  पर्वतावर  मार्कंडेय ऋषींचा आश्रय होता.  आदिशक्तीला  तप करून त्यांनी प्रसन्न करून घेतले होते. 
    ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात १७५५ व्या ओवीत "सप्तशृंगी" देवीचा उल्लेख आढळतो. 
तो मत्सेन्द्र सप्तशृंगी । 
भग्नावया चौरंगी ।
भेटला कि तो स्वर्गाशी ।
संपूर्ण झाला ।
    अशा या अर्धेपीठ असणाऱ्या आदिशक्ती "सप्तशृंगी" देवीचे वर्णन अहिराणी  लोकगीतामध्येही विवेचक, वेधक व निसर्गरम्यतेने रेखाटलेले आढळते. 
याळू सप्तशृंगी वं माय तेलनी ।
खानदेश तून माहेर वं माय तेलनी ।
कोकण तून सासर वं माय तेलनी ।
डोंगरले दीधा येढा वं माय तेलनी ।
सप्तशृंगी देवीचे माहेर हे खान्देशचे असून  जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कोकणा समाजाची वसाहत मोठ्या प्रमाणात राहत असल्याने ह्या भागाला कोकण असे  संबोधले जाते. नांदुरीचा या  भूभागाला पण कोकणच संबोधले जाते. हेच कोकण हे "सप्तशृंगी" देवीचे  सासर आहे."सप्तशृंगी" डोंगराला तू मायावी रूपाने वेढा दिला आहे असा उल्लेख या गीतात आढळतो. देवीची मान किंचीत वाकडी आहे याची कारणमीमांसा  एका गीतात आहे ती अशी 
सप्तरशिंगी माय वाकडी वं तुनि मान । 
खानदेश माहेर तिकडे वं तूनं ध्यान ।
देव मजार देव ही भवानी आभंड ।
दैतना मांघे पाडी डोंगरले खिंड ।
"सप्तशृंग" डोंगरासमोर असणार्या एका डोंगराला दैत्याच्या पाठीमागे धावतांना लाथ मारल्यावर खिंडार पडले आहे जे आजही पुरावा म्हणून आपणास दिसते असा लोकांचा समाज आहे. खान्देशातील माहेराकडे तू बारकाईने ध्यान देतेस म्हणूनच मान वाकडी केली आहे असा उल्लेख यामुळेच या गीतात आलेला आहे. 
सप्तरशिंगी माय गडवरली पिवळी ।
तिना दंडवर अठरा भूजानी काचोळी ।
या देवीला एकून अठरा भुजा आहेत व तिने परिधान केलेली काचोळीसुद्धा अठरा भुजांचीच आहे. एका गीतात हा गड चढायला फार अवघड आहे, असा उल्लेख आढळतो. 
सप्तरशिंग्या गड चढता चढायेना ।
मायना पायखाल उभा दैत गाडायेना ।
हा गड खूप उंच आहे त्यामुळे चढवला जात नाही. नंदुरीपासून पायी जाने पूर्वी फार जिकीरीचे होते आज बस गडावर जाते. त्यामुळे फक्त गडावरच्या पायर्या चढाव्या लागतात. तरीही वृद्ध व स्रियांना फार त्रास होतो. डोंगर,  दर्या,दाट वेळूचे वन, फुले, हजारोंची वानरसेना, कड्याकपारीतून झिरपणारे नितळ पाणी अशा स्वर्गस्थानी आई सप्तशृंगी विसावली आहे. 
तठे काय शोभे स्वर्गस्थान ।
तठे काय शोभेरे देवीनं ठाण।
अशा उंच ठिकाणी हि "सप्तशृंगी" आई स्थानापन्न झाली आहे. तिची नजर चहुबाजूला त्यामुळेच राहू शकते. वाघाचा घोडा व सापाचा चाबूक तिच्याजवळ आहे. जगदंबा "सप्तशृंगी" देवीचा गौरव या अहिराणी गीतांतून अनेक प्रतिमा, प्रतीके, विशेषणे, अलंकार लावून आपल्या पूर्वजांनी केला आहे 
श्री .खंडू मोरे,प्राथमिक शिक्षक फांगदर ता देवळा (नाशिक)

Tuesday, August 29, 2017

आदर्श शाळा फांगदर ता देवळा जिल्हा नाशिक

                  आदर्श शाळा फांगदर ता देवळा जिल्हा नाशिक
 नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या शेवटच्या गावातील फांगदर ह्या आदिवासी वस्तीवर वस्तीशाळा म्हणुन ही शाळा पंधरा वर्ष्यापुर्वी २ जुलै २००१ रोजी ह्या वस्तीवर सुरु झाली.शेतमजुरांच्या आदिवासी वस्तीवर अपुऱ्या भौतिक सुविधांच्या सहाय्याने सुरु असलेल्या अश्या आदिवासी शाळेतच लोकसहभागातून खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांच्या तोडीस तोड देणारा दर्जा आनंदा पवार व खंडु मोरे या शिक्षकांमुळे ह्या शाळेला मिळाला आहे.उपक्रम शिलतेच्या जोरावर राज्यातील कानाकोपऱ्यात ह्या शाळेचे नाव जाऊन पोहचले आहे.धरूया शिक्षणाची कास करुया वस्तीचा विकास ह्या ब्रिद वाक्य्यानुसार शाळेमुळे वस्तीचा विकास घडू लागला आहे.
            नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील चौथी व महाराष्ट्रातील पहिली आयएसओ मानांकन मिळवणांरी वस्तीशाळा ठरली आहे.शाळेत गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात.शाळेच्या विकासात खामखेडा ग्रामस्थ,विविध सामाजिक संस्था,समाजातील दानशुरांच्या सहाय्याने व आनंदा पवार व उपशिक्षक खंडू मोरे व पालकांच्या अथक परिश्रमातून राज्यभरातील समस्थ प्राथमिक शाळांना उर्जादाई असे कामकाज देवळा तालुक्यातील आदिवासी वस्तीवरील शाळेने महाराष्ट्रा समोर उभे केले आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शाळेने प्रगत शाळा म्हणुन लौकिक मिळवला आहे.गुणवत्ता विकासात शाळेने माघील पाच वर्ष्यापासून सतत अ श्रेणीत स्थान पटकावले आहे.
गिरणा नदीच्या काठावर कळवण,देवळा व सटाणा तालुक्याच्या हद्दीवर बसलेलं खामखेडा हे गाव देवळा तालुक्यातील ह्या गावाच्या उत्तरेला असलेल्या फांगदर ह्या आदिवासी बहुल वस्तीवर २ जुलै २००१ रोजी धरूया शिक्षणाची कास करुया वस्तीचा विकास ह्या शासनाच्या उदात्त धोरणातून वस्तीशाळा सुरु झाली.
            खामखेडा गावापासुन ४ किमी अंतरावर असणारे फांगदर हि पंचविस ते तिस घरांची आदिवासी शेतमजुरी करणाऱ्या लोकांची लोकवस्ती.ह्या वस्तीवर शाळा सुरु झाली.२००७ सालापर्यंत या शाळेची इमारत म्हणजे खाजगी कौलारू घर,कांदाचाळ,पत्र्यांचा शेड,खाजगी पत्र्यांची खोली,पाचटाचा झाप भौतिक सुविधांचा अभाव असलेली,अपुरी बैठक व्यवस्था असलेली शाळा अशी होती.
            मात्र २००७ मध्ये हि शाळा जिल्हा परिषदेकडे नियमित झाल्यावर सर्व शिक्षा अभियानातून शाळेला टुमदार इमारत मिळाली.टेकडीवर बांधकाम केलेली ही शाळा आज दोघां शिक्षकांनी शाळा स्तरावर राबवलेल्या ज्ञानरचनावाद,क्षेत्रभेट उपक्रम,डिजीटल इंटर अक्टीव क्लासरूम,औषधी बगीचा,सुंदर शैक्षणिक संकुल,विविध शैक्षणिक साहित्यातून अध्यापनाची गोडी,समारंभ,विविध जयंती उत्सव,सामाजिक संस्था,देणगीदारांच्या योगदानातून विकास करत शाळा स्तरावरील  विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्याने फांगदर शाळेची ही एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

उपक्रमशील शाळा
सतत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांमुळे जिल्ह्यातील सर्वाधिक उपक्रमशील शाळाअसा नावलौकिक या शाळेने मिळवला आहे. पाच वर्षांपूर्वी गुणवत्ता विकासात शाळा श्रेणीत होती.परंतु अवघ्या दोन वर्षांत शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि लोकसहभाग यामुळे फांगदर शाळेने अंतर्बाह्य़ बदल घडवून आणत थेट आयएसओ मानांकनालाच गवसणी घातली आहे. मुळात ही शाळा द्विशिक्षकी. परंतु शाळेचा हा कायापालट करण्यास शिक्षक खंडू मोरे आणि आनंदा पवार यांचे अपार प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

लोकसहभागातून शाळेचा विकास
            शाळेच्या प्रगतीत लोकसहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे.शाळेत येणारा सर्व विध्यार्थ्यी वर्ग हा शेतमजुर आदिवासी बांधवांचा असतांना देखील शिक्षकांनी आज पावेतो शाळास्तरावर जवळजवळ आठ लक्षाहून अधिक लोक सहभाग जमा करत शाळा विकासासाचे उपक्रम राबवलेले आहेत.कोणत्याही शासकीय मदतीविना शाळेने लोकसहभागातून एका वर्गात ई लर्निगच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापनाची सोय केली आहे.संगणक,प्रोजेक्टर,साउंड सिस्टीम, इंटर अक्टीव स्मार्ट बोर्ड,इम्प्लीफायर,यांसह आदर्शवत ईलर्निंग सुविधा ,देवळा डॉक्टर असोशियश,स्वप्निल अग्रो वडाळा,बिल्डर्स असोशियान मालेगाव चे अध्यक्ष रमेश शिरसाठ,सुनिल पाटील,नानाजी मोरे,सी आर पाटील,संजय बच्छाव ह्या दात्यांच्या मदतीने शाळेला मिळाली आहेत. या योगदानामुळे आदिवासी विध्यार्थीनां आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देत आहोत.शाळेचे क्रीडांगणही लोकसहभागातूनच तयार झाले आहे. उमाजी देवरे, भाऊसाहेब देवरे, प्रभाकर शेवाळे या गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून चारशे फुटावरून शाळेसाठी स्वत:च्या विहिरीवरून जलवाहिनी उपलब्ध करून दिली आहे. तर संजय बच्छाव यांनी शालेय आवारात शालेय कमान तयार करून दिली.
                        शाळा रंगरंगोटी, ,औषधी बगीचा,सुंदर शैक्षणिक संकुल,साहित्य निर्मिती,पाण्याची व्यवस्था,हातपंप,शालेय आवारात पाच लक्ष खर्च करत फेवर ब्लॉक, भौतिक सुविधांची पुर्तता करत हे तशेच अनेक काम शिक्षकांनी शाळा स्तरावर केली आहेत.
भिंती-फरशी झाल्या बोलक्या
विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी दररोज एक प्रश्न विचारला जातो.प्रयोगशील शिक्षणाच्या बाबतीत इतर शाळांपेक्षा फांगदर एक पाऊल पुढे आहे. शाळेतील दोन्ही वर्गात जमिनीवर मुळाक्षरे, गणिताचे ज्ञानरचना वादी तक्ते रंगविण्यात आले आहेत.बेरीज पाट्या ,वजाबाकी पाट्या ,स्थानिक संख्या ओळख,यांसह इतर अनेक शैक्षणिक घातक शिकविण्यासाठी तळ फळे तयार करत विध्यार्थी प्रत्यक्ष कृतीतुन अशाच पद्धतीने शिकत आहेत. शाळेत मुलांच्या क्षमतांनुसार तीन गट तयार करून त्यांच्या गरजेनुसार तयारी करून घेतली जाते. वाचन प्रेरणा दिन इतर शाळांमध्ये वर्गात चार भिंतींआड साजरा झाला. फांगदर शाळेने मात्र तो निसर्गाच्या सान्निध्यात टेकडीवर जाऊन प्रत्यक विद्यार्थ्यांस एकेक धडा वाचावयास सांगून साजरा करण्यात आला.
हिरवाईने नटलेली शाळा
           
शालेय आवारातील वृक्षसंपदा व शाळेचे मनोहारी रूप भुरळ घालते. टेकडीच्या माथ्यावर टुमदार अशी शाळेची इमारत आकर्षक रंगरंगोटीने लक्ष वेधून घेते.आज तालुक्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून फांगदर शाळेकडे पाहिले जाते. पिण्यास देखील पाणी मिळणे मुश्कील असलेल्या ठिकाणी खडकाळ माळरानावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा हिरवाईने नटवली आहे.
               शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक झाडे आहेत.त्यात बेचाळीस औषधी वनस्पतींचा बगीचा शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला आहे.हिरडा ,बेहडा,जायफळ,कोरपड,आनंद,जयपाल,आवळा,तुळस,रिठा,निंब,वड,अश्वगंधा,यासह जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील पहिली औषधी बगिचा असलेली शाळा शिक्षकांनी प्रतिकुल परिस्थितीत निर्माण केली आहे. शालेय आवारातील प्रत्येक वृक्षास शिक्षकांनी नावे दिली  आहेत.त्यामुळे विध्यार्थ्यांना वृक्षांची ओळख होत असते.शाळेत वॉटर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या शिवाय कार्यालयात कार्पेट, प्रत्येक वर्गातील खिडक्यांना पडदे, विद्यार्थी-शिक्षकांना ओळखपत्र यामुळे ही आपले वेगळेपण सिद्ध करत नावारुपास आली आहे.
           शालेय आवारात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी झाडांवर बाटल्यांच्या साहाय्याने सुविधा केली आहे. त्यामुळे चिमणी, साळुंखी, कावळे यांसह विविध पक्ष्यांचा किलबिलाट शालेय आवारात ऐकू येतो.
तालुक्यातील पहिली डिजिटल ईलर्निंग शाळा
तालुक्यातील पाहिली डिजिटल ईलर्निंग शाळा म्हणून फांगदर शाळेचा लौकिक आहे. संगणक, इंटरअ‍ॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टरवर शाळेत अध्यापन केले जाते.आदिवासी शेतमजुरांची मुल अध्यापन करत असतांना ह्या साधनांचा कुशलतेने वापर करतात.ई लìनग सुविधा शाळेत आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी टॅबलेटच्या साहाय्याने शिक्षण घेत असल्याचे परिसरात मोठे अप्रूप आहे.तंत्रस्नेही साधनांचा प्रभावी वापर करत शाळेतील चौथीतील मुले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्वतः तयार करतात.शाळेतील पहिली पासुन विध्यार्थी संगणक हाताळत असल्याचे विधायक चित्र ह्या शाळेवर पहावयास मिळते.शिक्षकांनी विविध शैक्षणिक व्हीडीओस तयार केले असुन शाळेचा स्वतंत्र ब्लॉग आहे. ह्या साधनांचा अध्यापनात वापर होत असल्याने विध्यार्थी उपस्थिती व गुणवत्ता वाढ झाली आहे.
क्षेत्रभेटीला महत्त्व
अध्ययन व अध्यापन प्रक्रिया विविध उपक्रमांच्या माध्यमांद्वारे फांगदर शाळेत रंजक बनविण्यात आली आहे.पारंपरिक खडू फळाया पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न सुरू असून क्षेत्रभेट उपक्रमामागे चार भिंतींच्या आड मिळालेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे हा उद्देश आहे. घोकंपट्टी पद्धतीच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त केले जात आहे.कधी टेकडीवर, कधी उघडय़ा मैदानावर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्देशाने नेऊन विद्यार्थी व शिक्षकांमधील अनामिक भीती दूर कशी होईल, ते पाहिले जात आहे.
              नदी, घाट, लघु उद्योग, बायोगॅस प्रकल्प, आदर्श आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी, कुक्कुटपालन उद्योग, साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमात असलेल्या अनेक गोष्टी समजून घेण्यास मदत होते. या शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीतही भर पडते.
  विध्यार्थ्यांना चाकोरी भायेर पडत अध्यापन करतांना सुलभता व सहजता अनुभवास येत असल्याने सहज शिक्षण यातुन निर्माण होत असते.शिक्षकांच्या धडपडीमुळे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा इथपर्यंतचा विकास घडून आला आहे.ही शाळा म्हणजे शिक्षण विभागासाठी भूषण असल्याची जिल्हा परिषदेचे शिक्षण व लोकप्रतिनिधींच्या शाळा भेटी दरम्यानच्या प्रतिक्रिया शाळेविषयी सर्व काही सांगून जाते.
अक्षरांची रांगोळी
अक्षरधाराया उपक्रमांतर्गत गारगोटीच्या दगडांपासून, शंख-िशपल्यांपासून विद्यार्थी अक्षरांची रांगोळी रेखाटतात. या शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, उकार यांची जोड देत नवीन शब्द तयार करण्यास शिकविले जाते. त्यांच्या नेहमीच्या खेळातल्या या वस्तू वापरून जोडशब्द शिकविण्याची ही न्यारी पद्धत विद्यार्थ्यांना भावते. प्रत्यक्ष कृतीतून शब्द तयार करण्याची अक्षरधारा पद्धत विद्यार्थ्यांवर लहान वयातच भाषेचे उत्तम संस्कार करते.
 दप्तरमुक्त शनिवार
 शालेय वेळेत विद्ध्यार्थी अनेक शैक्षणिक उद्धीष्ट पूर्ण करत असतात.त्यामुळे सर्वांगीण विकासाचे अनेक बाबी ह्या नियोजनात असतांना देखील माघे पडतात.त्यामुळे शैक्षणिक घटक पूर्ण करण्यासाठी नेहमी शिक्षकांनां कसरत करावी लागत असते.विध्यार्थी सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच कवायत,व्यायाम,योगासने,प्राणायाम,ईलर्निंग साहित्याचा अधिक वापर,ज्ञानरचना वादी साहित्य ,विविध साहित्य खेळ ह्या बाबी माघे राहतात.ह्या सर्व बाबी आम्ही दर शनिवारी प्रभावीपणे राबवत असतो.ह्या दिवशी मुलांच्या दप्तराला सुट्टी असते.मागील शैक्षणिक वर्ष्यात दप्तर मुक्त शनिवारी सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवत असल्याने शनिवारची उपस्थिती शंभर टक्के टिकवुन ठेवण्यात यश आले आहे.
प्राणी-पक्षी-फुले आम्ही शाळेची वर्गात हजेरी लावण्याची
पद्धतीही मजेशीर आहे. हजेरीच्या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नाव पुकारल्यानंतर यस सरम्हणण्याऐवजी विद्यार्थी फळांची, फुलांची, प्राण्यांची, पदार्थाची मराठी अथवा इंग्रजी नावे घेतात.त्यामुळे दररोजची हजेरी कंटाळवाणी होत नाहीच; शिवाय विद्यार्थी वेगवेगळ्या फुलांची, फळांची, प्राण्यांची नावे शिकून येत असल्याने त्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासही मदत होते. साधा हजेरीचा कार्यक्रमही शाळेने ज्ञानरचनावादी केला आहे.
सोशियल मीडियाचा वापर
जिल्ह्यातील पाहिला शाळेचा http://khandumore34dreamsschool.blogspot.in/ब्लॉग असणारी पहिली शाळा फांगदर आहे.त्याच बरोबर शिक्षकांनी स्वतःचा ब्लॉग तशेच khandumore शैक्षणिक युट्युब चानल तयार केले असुन अनेक शैक्षणिक साहित्य ह्या ठिकाणी पहावयास मिळते.शाळेचा नावाचे zpschoolfhangdar या नावाने फेसबुक पेज केले असल्याने शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम नेहमी शिक्षक सोशियल माध्यमातुन झळकवत असल्याने शाळेचे विविध उपक्रम राज्यभर राबवले जात आहेत.व सामाजिक संस्थाकडून ह्या शाळेला विविध शैक्षणिक साहित्य शैक्षणिक उठाव देखील मिळत आहे.
शालेय वस्तु भांडार
शाळेत येणाऱ्या विध्यार्थींची परिस्थिती हलाकीची आहे.त्यामुळे व वस्तीवर शालेय गरजा पूर्ण होतील अशी व्यवस्था नसल्याने आम्ही शिक्षकांनी शाळेत वस्तु भांडार तयार केले आहे.ह्या वस्तु भांडारात विध्यार्थ्यांना पेन,पेन्सिल,वह्या,रंग,तशेच शालेय शैक्षणिक साहित्य नां नफा नां तोटा या तत्वावर मिळते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा शाळेतच पूर्ण होतात.याचा हिशोब शाळेतील विध्यार्थी ठेवत असल्याने विध्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान शाळेतच मिळत असल्याने विध्यार्थ्यांचे हे वस्तु भांडार कौतुकाचा विषय ठरले आहे.

शाळा भेटी
माघील वर्ष भरात अनेक शाळातील शिक्षक अधिकारी,पदाधिकारी,पाच हजार हुन अधिक ग्रामस्थांनी शाळेस भेट देऊन शाळेने विध्याथीं गुणवत्ता व उपस्थिती वाढीसाठी राबवलेले उपक्रम समजून घेत आहेत.ह्या वर्षी चांदवड देवळा मतदार संघाचे आ डॉ राहुल आहेर यांनी स्वतः भेट देत शाळेचे विविध उपक्रम जाणुन घेतले.ही बाबशाळा,वस्ती व गावासाठी अभिमानाची बाब आहे.


   शालेय शैक्षणीक उपक्रमांसोबत शाळेने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे.समाजाशी संपर्क ठेवत शाळेने माघील वर्षभरात शाळा विकासासाठी वस्तु तशेच निधीच्या स्वरुपात आठ लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव केला असुन “शाळेला गावाचा आधार असावा,व गावाला शाळेचा अभिमान वाटावा’’अश्या प्रकारे येथील पालक,ग्रामस्थ ,सामाजिक संस्था ,लोकप्रतिनिधी व मुख्या आनंदा पवार व खंडू मोरे या शिक्षकांच्या अथक प्रयत्नातुन,सुंदर समन्वयातून शाळेचा विकास घडून येत आहे.
                                  
   एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर कार्य तडीस गेल्याचा समाधानाचा आनंद हा परमोच्य आनंद ठरतो.तसाच शाळा विकासासाठी व ते कार्य  फलद्रूप होतांना पहातांनाचा आनंद हा अवर्णीय असाच आहे.
एका आदिवासी वस्तीवरील कुणाच्याही खिजगणितात नसलेल्या आमच्या शाळेला ह्या आर्थिक वर्ष्यात शाळा विकासासाठी भरीव  निधी आमच्याशाळेला मिळत आहे.ही आमच्या कामाचीच पावती आहे.



आमच्या ह्या शाळेसाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी मा खा हरिचंद्र चव्हाण,आ डॉ राहुल आहेर,मा धनश्री आहेर(जि.प.सदस्या लोह्ननेर ),नुतन आहेर ( जि.प.सदस्या वाखारी ),केशरबाई आहिरे (सभापती पंचायत समिती देवळा),कल्पनाताई देशमुख (पंचायत समिती सदस्या लोह्ननेर)  यांचे मोलाचे सहकार्य तशेच मा दिपकुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ,प्राथमिक शिक्षणाधिकारी मा राजीव म्हसकर ,मा श्रीम पुष्पावती पाटील शिक्षण उपायुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक विभाग ,मा.श्री.महेश पाटील (गटविकास अधि देवळा),मा श्रीम.शोभा पारधी(गटशिक्षण अधिकारी पं.स.देवळा),मा सतिश बच्छाव ,नंदू देवरे(शिक्षणविस्तार अधिकारी पं.स.देवळा),मा शिरीष पवार(केंद्रप्रमुख खामखेडा)व तालुक्यातील केंद्र्प्रमुख,जिल्हा तशेच राज्य भरातील प्रेरक प्रेरणा स्रोतांचे ,शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत असुन शाळेला आत्तापर्यंत मिळालेले सर्व यश पालक,ग्रामस्थ ,अधिकारी ,शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने प्राप्त झाले आहे.
अशीच आमची शाळेची उत्तोरत्तर प्रगती होत जावो या व विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याबरोबर सक्षम,सुजान नागरिक निर्माण होऊन एक सशक्त,समृद्ध,भारत निर्माण आमच्या हातुन घडोत ह्या साठी आपल्या अशिर्वाद चिंतितो.


Monday, July 3, 2017

आमची परसबाग

आमची परसबाग
             खडकाळ डोंगराच्या माळरानावरआमच्या फांगदर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही सुंदर परसबाग फुलविली.या बागेत दीडशे झाडांबरोबर शाळेकडून परसबागेत भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे.बागेतील ताज्या भाज्यांचा शालेय पोषण आहारासाठी वापर केला जात असल्याने मुलांना दररोज सकस आहार मिळतअसतो.
                    खामखेडा  (ता. देवळा ) येथील फांगदर जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे अठावीस विद्यार्थी शिक्षण घेत असूनदोन  शिक्षक आहेत. शाळेत नवनवीन उपक्रम राबविले जात असल्याने वस्तीवरील नागरिकाकडून ,पालकाकडून तशेच गावकऱ्यांतून समाधान व्यक्‍त केले जाते. शाळेतील शिक्षक आनंदा पवार यांनी विद्यार्थ्यांना खरीप व रब्बीच्या पिकांची माहिती व्हावीया उद्देशाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्रपाण्याअभावी अडचण येत होती. दरम्यानशाळा परिसरातील भाऊसाहेभ उमाजी देवरे यांनी आपल्या कुपनालीकेवरून पाणी जोडणी करून घ्या अशी शिक्षकांना विनंती केली ह्या दातृत्वाची लगोलग शिक्षकांनी काम मार्गी लावत दोन इंची व्यासाची अठरा पाईप आणून जेसिपीने चारी खोदाई करत पाईपलाईन टाकुन घेतली आता दर दिवसाआड शालेय परिसरातील एक हजार क्षमतेची टाकी भरत झाडानाही पाणी दिले जात आहे   


















शालेय आवारातील परसबाग


                        त्यानंतर शिक्षक आनंदा पवार व खंडू मोरे यांनी तिसरीचौथीतील वर्गातील विद्यार्थ्यांना कामाला सुरवात केली. इयत्ता चौथीतील दिपक गांगुर्डे ,खुशाल सोनवणे ,समृद्धी पवार,दिग्यासा सूर्यवंशी ,पुजा बच्छाव रिंकी गांगुर्डे,अशा सोनवणे ,वैशाली सोनवणे ,हर्षद वाघ या विद्यार्थ्यांनीचार पाच वाफे तयार करत मेथीकोथिंबीरपालक या पालेभाज्यांसह मिरचीटोमॅटेवांग्याची लागवड केली. विद्यार्थ्यांनीच निंदणीखुडणीची कामे करून ही परसबाग फुलविली. दरम्यानखरीप पिकांबाबत माहिती मिळण्यासाठी जूनमध्ये आंबाडीज्वारीमूगभुईमूगउडीद ही खरिपाची पिके घेण्यात आली होती. 
 पालेभाज्यांचा पोषण आहारासाठी वापर 
परसबागेतील ताज्या पालेभाज्यांचा वापर शालेय पोषण आहारासाठी केला जात आहे. मुलांना सकस आहार मिळत असल्याने पालकांतूनही समाधान व्यक्‍त होत आहे. तशेच शालेय परिसारत गिलके,दोडके,तशेच अडुळसा ,कोरपड,रानतुळस,कर्दळ,लाजाळू ,डीडोनिया अशे औषधी वनस्पती देखील लावल्या आहेत















देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी म्याडम परसबागेस भेट देताना
शिक्षक काय म्हणतात... 
आनंदा पवार , शिक्षक : विद्यार्थ्यांना खरीप व रब्बीच्या पिकांची माहिती व्हावीया उद्देशाने आतापर्यंत नोकरी केलेल्या प्रत्येक शाळेत परसबाग फुलविली आहे. यापूर्वी तुंगण,राजापुर  येथील शाळेत हा उपक्रम राबविला. त्या ठिाकणी आजही विद्यार्थ्यांनी हा पायंडा कायम ठेवला आहे.

खंडू मोरे शिक्षक : विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. गावातच राहत असल्याने शाळेला सुट्टी तशेच शालेय वेळेनंतरही  बराच वेळ परसबागेत असतो. यासाठी पालकांसह गावातील भजनी मंडळ , शालेय विध्यार्थी , शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बच्छाव,भाऊसाहेब देवरे
,भास्कर वाघ,बापू वाघ ,सुरेश वाघ.खंडू पवार व पालकवर्ग यांची मोठी मदत मिळाली.
  गटशिक्षण अधिकाऱ्यांची परसबागेस भेट
देवळा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी म्याडम यांनी भेट देत ह्या उपक्रमाची स्तुती केली ह्या उपक्रमांमुळे विध्यार्थ्यांना शाळेची गोडी लागतेच त्या बरोबर भाजीपाला वर्गीय पिकांची ओळख होत असल्याचे सांगितले.ह्याच बरोबर शाळेस भेट देणाऱ्या सर्वच मान्यवर शाळेने तयार केलेल्या बागेला भेट देत असतात.